मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू !

By Admin | Published: February 5, 2017 11:29 PM2017-02-05T23:29:40+5:302017-02-05T23:32:13+5:30

उस्मानाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात.

Free 25 percent admission process! | मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू !

मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू !

googlenewsNext

उस्मानाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांनाही प्रतिथयश इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेला ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढू लागला असून त्याच प्रमाणात इंग्रजी शाळांची संख्याही वाढू लागली आहे. आर्थिक कुवत असणारे पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये दाखल करीत आहेत. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना इच्छा असूनही अशा शाळांमध्ये दाखल करू शकत नाहीत. हाच प्रश्न लक्षात घेवून शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी अशा शाळांमध्ये मोफत २५ टक्के प्रवेश देण्यासाठीची योजना हाती घेतली. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी प्रवेशअर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. १६ जानेवारीपासून शाळांची नोंदणी सुरू होवून ही प्रक्रिया १९ दिवस चालली. यानंतर लागलीच ५ फेब्रुवारीपासून प्रत्यख प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दाखल होणाऱ्या अर्जातून सोडतीद्वारे विद्यार्थ्यांच्या शाळा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी पाच सोडतीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिली सोडत २७ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. प्रत्येक सोडतीनंतर उर्वरित जागा, शाळा आॅनलाईन दिसणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया एप्रिलपर्यंत चालणार आहे.
पालकांनी नजिकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे विविध आरक्षण असलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याकांना नर्सरी व पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे.

Web Title: Free 25 percent admission process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.