बीसीसीआयने सीईओना एसजीएमपासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:37 AM2017-07-27T02:37:36+5:302017-07-28T13:06:11+5:30

whatsapp join usJoin us
BCCI, SGM, CEO, sports, news | बीसीसीआयने सीईओना एसजीएमपासून रोखले

बीसीसीआयने सीईओना एसजीएमपासून रोखले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केवळ दोन पदाधिकाºयांना बैठकीत सहभागी होण्याची परवानगी दिली असल्याने आदेशाचे तंतोतंत पालन करीत बीसीसीआयने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले राहुल जोहरी यांना विशेष आमसभेस (एसजीएम) उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली आहे.
जोहरी यांच्याशिवाय ओडिशा आणि पंजाब संघटनेच्या प्रतिनिधींनादेखील बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. कारण हे प्रतिनिधी संबंधित संघटनेचे पदाधिकारी नाहीत, असे बीसीसीआयला वाटते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित राहण्यायोग्य आहेत त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव किंवा सहायक सचिव आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश असावा.
काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी जोहरी यांच्यासह बीसीसीआयच्या सर्व कर्मचाºयांना एसजीएममधून बाहेर जाण्यास सांगितले. केवळ पदाधिकारी हेच बैठकीत सहभागी होऊ शकतात, असा २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. बीसीसीआय कर्मचाºयांचे संपूर्ण पथक बैठकीदरम्यान सेवेत कार्यरत
असते. पण सावध झालेल्या बीसीसीआयने या वेळी नियमांचे तंतोतंत पालन केले आहे. स्वत:चे
नाव उघड न करण्याच्या अटीवर
एका राज्य संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले, की जोहरी हे पदाधिकारी नाहीत. बीसीसीआयकडून वेतन मिळणारे कर्मचारी आहेत. त्यांनी याआधीच्या सर्वच एसजीएममध्ये भाग घेतला होता, पण या वेळी आम्ही कुठलीही जोखीम पत्करणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्वतोपरी करणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: BCCI, SGM, CEO, sports, news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.