शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:47 AM2018-04-07T10:47:23+5:302018-04-07T10:47:23+5:30

काही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

You are not eligible to speak against Sharad Pawar, Dhananjay Munde is responsible for the Chief Minister | शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला

शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला

Next
ठळक मुद्देसोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलनकाही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही


सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असाल पण शरद पवार यांच्याविरोधात बोलायची तुमची लायकी नाही. तुम्ही दिवसा चहा पीत असला तरी रात्री कुठली आणि किती पिता हे माहीत आहे. काही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.
सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन सभा  नॉर्थकोट मैदानावर झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा निरीक्षक प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोलते-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, उमेश पाटील, निर्मला बावीकर, सुनीता रोटे, मनोहर सपाटे, किसन जाधव, महेश गादेकर, जुबेर बागवान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले. 
 धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस आज मुंबईत बोलताना पवार साहेब औषधाला उरणार नाही, असे बोलले. फडणवीसांचे गुरु दिल्लीत बसलेत. तुमचा गुरू पवार साहेबांचे बोट धरुन राजकारणात आल्याचे कबूल करतो. त्याचे तरी ऐका. पहिल्या अधिवेशनानंतरच तुमचे सरकार पडले असते. जनाची नाही तरी मनाची बाळगा, अशी टीकाही त्यांनी केली. 

Web Title: You are not eligible to speak against Sharad Pawar, Dhananjay Munde is responsible for the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.