World Telecommunication Day; तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेद्वारे कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:37 PM2019-05-17T12:37:30+5:302019-05-17T12:38:59+5:30

जागतिक दूरसंचार दिन : शहरात ३ किमी आॅप्टिकल फायबर टाकून आधुनिकतेचे पाऊल टाकले

World Telecommunication Day; Connected through 371 Gram Panchayat Internet Service in Solapur District in three years | World Telecommunication Day; तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेद्वारे कनेक्ट

World Telecommunication Day; तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेद्वारे कनेक्ट

googlenewsNext
ठळक मुद्देमागील दोन वर्षांत शहरातील ३ किलोमीटर अंतरावर तांब्याच्या तारेची वायरिंग काढून त्या ठिकाणी आधुनिक फायबर आॅप्टिकल लाईन टाकली तीन वर्षांत जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेने जोडून आधुनिक तेचे पाऊल टाकले आहे.

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : विविध घटकांना जोडून ठेवणाºया दूरसंचार खात्याने सोलापुरात कात टाकायला सुरूवात केली आहे. मागील दोन वर्षांत शहरातील ३ किलोमीटर अंतरावर तांब्याच्या तारेची वायरिंग काढून त्या ठिकाणी आधुनिक फायबर आॅप्टिकल लाईन टाकली आहे़ तसेच तीन वर्षांत जिल्ह्यातील ३७१ ग्रामपंचायती इंटरनेट सेवेने जोडून आधुनिक तेचे पाऊल टाकले आहे.

१७ मे : जागतिक दूरसंचार दिन म्हणून पाळला जात आहे़ यानिमित्त बीएसएनएलचा जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता सोलापूर कार्यालयाने कात टाकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे़ ग्रामीण भागात बीएसएनएल ते ग्रामपंचायतपर्यंत फायबर आॅिप्टकल टाकायला सुरुवात करण्यात आली आहे़ जुनी तांबे धातू असलेली लाईन काढण्याचे काम सुरू असून, याबरोबर आॅप्टिकल लाईन टाकली जात आहे़ यामुळे एफटीटीएसची जोडणी वाढणार असून, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़ नागरिकांच्या प्रश्नांवर तक्रार नोंदवण्यासाठी १९५ आणि १९८ हे दोन हेल्पलाईन नंबर दिले आहेत़ ग्रामीण भागात ज्या ठिकाणी टू जी आहे त्या ठिकाणी भारत संचार निगमने १४७ ठिकाणी अल्का टेलची यंत्रणा वापरून सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेषत: सोलापूर शहराबरोबर बार्शी, पंढरपूर येथेही तांब्याची वायर काढून त्या ठिकाणी फायबर आॅप्टिकल वायर टाकण्याचे काम हाती घेतले आहे़ लँडलाईनची व्यवस्था टिकून राहावी म्हणून न्यू जनरेशन नेटवर्क (एऩजी़एऩ) ही मोहीम हाती घेतली आहे़ जिल्ह्यात ९ तालुक्यांच्या ठिकाणी या कामाला सुरुवात करण्यात आली आहे़ नव्या टेक्नॉलॉजीचा वापर यात वाढवला गेला आहे़ ही सारी विकासकामे पाहता जग मुठीत आणण्याचे आणि दोन माणसांमधील संवाद वाढवण्याचे काम दूरसंचारकडून होत आहे.

९५ ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट
- जिल्ह्यात काही खेड्यांमध्ये मोबाईल रेंज पोहोचत नाही़ अशाही ठिकाणच्या शेतकरी आणि नव्या पिढीतील अंतर कमी करण्यासाठी, त्यांची गैरसोय टाळण्यासाठी बीएसएनएलने सरल वायफाय हॉटस्पॉट सुरू केली आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक खेड्यात ८५ ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट लावले गेले आहेत़ यापूर्वी आणखी ७५ वायफाय हॉटस्पॉट लावले गेले आहेत़ आता जिल्ह्यात वायफाय हॉटस्पॉटची संख्या ही १७० झाली आहे़ या वायफाय हॉटस्पॉटमुळे ज्या भागात रेंज नाही त्या भागात जवळपास १०० मीटरपर्यंत कव्हरेज मिळते़ 

गेल्या तीन वर्षांत बीएसएनएलने अनेक कामे हाती घेतली आहेत़ सर्वसामान्यांसाठी पेज आठनुसार नवे मोबाईल प्रोजेक्ट आणले जात आहेत़ त्याची ७० टक्के पूर्तता झाली आहे़ मोबाईलच्या रेंजबाबत नवे ८५ टॉवर उभारले गेले आहेत़ त्यामुळे मोबाईलची स्पष्टता वाढण्यास मदत झाली आहे़ याबरोबरच प्रत्येक वर्षी ४ हजार नवे धारक (जोडणी) करण्याचे उद्दिष्ट दिले गेले आहे़ 
बी़ जे़ उंबरजे
- उपमहाप्रबंधक, बीएसएनएल

Web Title: World Telecommunication Day; Connected through 371 Gram Panchayat Internet Service in Solapur District in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.