Women's Day Special : छेड काढणाºया रोडरोमिओंना सोलापूर शहर पोलीस दलातील ‘दामिनींचा धाक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:03 AM2019-03-08T11:03:58+5:302019-03-08T11:05:42+5:30

संताजी शिंदे  सोलापूर : कुठेही छेडछाड होत असेल, असुरक्षितता जाणवत असेल तर अशा ठिकाणी मुली व महिलांना निर्भयपणे वावरता ...

Women's Day Special: Solar City Police Force's 'Damini Thak' in RoadRominations! | Women's Day Special : छेड काढणाºया रोडरोमिओंना सोलापूर शहर पोलीस दलातील ‘दामिनींचा धाक’ !

Women's Day Special : छेड काढणाºया रोडरोमिओंना सोलापूर शहर पोलीस दलातील ‘दामिनींचा धाक’ !

googlenewsNext
ठळक मुद्देशाळा-कॉलेजमध्ये जाऊन मुलींचे कायदेशीर सल्ला देवुन समुपदेशन व जनजागृती करण्याचे काम दामिनी पथकाकडून केले जात आहेटोल फ्री नंबरवरून फोन केल्यास दामिनी पथक किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे तत्काळ त्या ठिकाणी जातात

संताजी शिंदे 

सोलापूर : कुठेही छेडछाड होत असेल, असुरक्षितता जाणवत असेल तर अशा ठिकाणी मुली व महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी शहरात मोटरसायकलवरून दामिनी पथक गस्त घालत आहे. या प्रकारामुळे रोडरोमिओला चाप बसला असून, महिलांना दिलासा मिळत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन मुलींचे कायदेशीर सल्ला देवुन समुपदेशन व जनजागृती करण्याचे काम दामिनी पथकाकडून केले जात आहे. 

घराच्या बाहेर पडणारी मुलगी असो किंवा महिला जागोजागी रोडरोमिओंचा वाईट अनुभव येत असतो. बहुतांश मुली या प्रकारामुळे शाळेला किंवा कॉलेजला जाण्यास घाबरतात. बाहेर होणारा त्रास घरच्यांना सांगितला की शिक्षण बंद होईल, या भीतीपोटी हा त्रास निमूटपणे सहन करतात. अशा परिस्थितीत मुलींना व महिलांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील रणरागिण्या सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान शहरातील विविध भागांत गस्त घालत असतात. मुलींना छेड काढण्याच्या उद्देशाने थांबलेल्या रोडरोमिओंना हटकतात, तेथून निघून जाण्यास सांगतात. काही ठिकाणी जर बिकट प्रसंग उद्भवत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवून घेतात.

दररोज मुलींच्या शाळा व कॉलेजमध्ये दामिनी पथकाची भेट असते. मुख्याध्यापक, प्राचार्य यांची भेट घेऊन चौकशी केली जाते. हजेरी बुकावर सही करून दामिनी पुढील कामाला निघते. मुलींना काही त्रास आहे का? असल्यास गुपचूप आम्हाला सांगा आम्ही बंदोबस्त करतो, असे आवाहन मुलींना करतात. शहरात कोठेही महिला असुरक्षित असेल तर त्यांच्यासाठी १०९८, १९१ किंवा १०० नंबरवर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टोल फ्री नंबरवरून फोन केल्यास दामिनी पथक किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे तत्काळ त्या ठिकाणी जातात.

पोलीस ठाणेनिहाय दामिनी पथक...
- फौजदार चावडी पोलीस ठाणे- भाग्यश्री गुंड, रत्ना सोनवणे, जेलरोड- अर्चना जमादार, एमआयडीसी- संगीता डोळस, जोडभावी पेठ- रूपा माशाळ, गंगा खोबरे, सदर बझार- शरावती सलगर वस्ती- ज्योती शेरखाने, निलाबाई इमडे, औद्योगिक पोलीस चौकी- भाग्यश्री केदार, आयटीआय पोलीस चौकी- अंजली दहिहांडे, मीनाक्षी नारंगकर. फौजदार हर्षा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक शहरात गस्त घालत असते. 

सहन करू नका, पोलिसांना माहिती द्या : अभय डोंगरे
- शहरातील मुली, महिला सुरक्षित राहाव्यात, छेडछाडीला आळा बसावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाच्या वतीने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. हे दामिनी पथक दिवसभर शहरात फिरतीवर असते, या पथकावर थेट आयुक्तालयाच्या कंट्रोल विभागातून नियंत्रण असते. महिलांनी निर्भय राहून घराच्या बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी केले. 

Web Title: Women's Day Special: Solar City Police Force's 'Damini Thak' in RoadRominations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.