दोरीने गळा आवळून पत्नीचा खून; सोलापूर जिल्ह्यातील येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:20 AM2019-01-07T10:20:54+5:302019-01-07T10:22:24+5:30

कुसळंब : पती व पत्नीमध्ये सतत होणाºया भांडणामुळेच पत्नीचा पतीने दोरीने गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे; ...

Wife's murder; The incident in Solapur district | दोरीने गळा आवळून पत्नीचा खून; सोलापूर जिल्ह्यातील येथील घटना

दोरीने गळा आवळून पत्नीचा खून; सोलापूर जिल्ह्यातील येथील घटना

Next
ठळक मुद्देशौचालयामध्ये गळफास घेतल्याचा बनाव बार्शी तालुक्यातील पतीविरुद्ध गुन्हा दाखलशवविच्छेदनात सत्य उघड

कुसळंब : पती व पत्नीमध्ये सतत होणाºया भांडणामुळेच पत्नीचा पतीने दोरीने गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे;  मात्र तत्पूर्वी पत्नीने शौचालयामध्ये जाऊन गळफास घेतल्याचा बनाव पतीने केला होता. ही घटना शनिवारी पहाटे तीनपूर्वी नारी (ता. बार्शी) येथे घडली. पांगरी पोलिसांत पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

खून झालेल्या महिलेचे नाव रतन जगन्नाथ कदम (वय ४०) असे आहे. सुनील गोवर्धन कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी रात्री मटण आणले व घरात बिर्याणी केली. मयत भावजय रतन व जगन्नाथ याला रात्री त्यांच्या घरात बिर्याणी खाण्यासाठी नेऊन दिली. तेव्हा किरकोळ भांडण चालू होते व आम्ही जेवणखाण करुन झोपी गेलो. शनिवारी पहाटेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ जगन्नाथ गोवर्धन कदम संशयित आरोपीने मला मोठ्याने हाका मारू लागला. आम्ही दार उघडून बाहेर आलो असता त्याने शौचालयामध्ये रतन हिने सुताच्या दोरीने गळफास घेतला असून, तिच्या अंगास हात लावून पाहिले असता अंग गरम लागल्याने तिचा गळफास सोडवून अंगणात झोपवल्याचे सांगितले. या प्रकरणी पांगरी पोलिसांत जगन्नाथ गोवर्धन कदम याच्याविरुध्द भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

शवविच्छेदनात सत्य उघड

- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मयत रतन यांना बार्शी येथे नेण्यात आले. तेव्हा वैद्यकीय अधिकाºयांनी मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर रतनचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर  वैद्यकीय अधिकाºयांनी गळा आवळल्यामुळे रतन हिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

Web Title: Wife's murder; The incident in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.