योगगुरू बाबा रामदेव यांचे सोलापूरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 07:47 PM2018-03-16T19:47:23+5:302018-03-16T19:47:23+5:30

बाबा रामदेव चार दिवस सोलापूर दौºयावर, अक्कलकोटसह सोलापूर शहरातील विविध कार्यक्रमांना राहणार हजेरी

Welcome to Yogguru Baba Ramdev Solapur | योगगुरू बाबा रामदेव यांचे सोलापूरात स्वागत

योगगुरू बाबा रामदेव यांचे सोलापूरात स्वागत

Next

सोलापूर : भारत माता की जय़़...बाबा रामदेव की जय़़़ करे योग़़रहे निरोग़़...अशा घोषणा देत ढोल ताशाचा गजर, फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांचा कडकडाटात योगगुरू बाबा रामदेव यांचे सोलापूर विमानतळावर जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले़  प्रारंभी पतंजली परिवाराच्यावतीने योगगुरू बाबा रामदेव यांचे औक्षण करण्यात आले़.

अक्कलकोटसह सोलापूरातील विविध कार्यक्रमासाठी योगगुरू बाबा रामदेव हे चार दिवस सोलापूरच्या दौºयावर आहेत़ त्यासाठी बाबा रामदेव यांचे शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास सोलापूर विमानतळावर आगमन झाले़ यावेळी पतंजली परिवाराच्यावतीने बाबा रामदेव यांचे औक्षण करण्यात आले़ यावेळी  राज्याचे सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, पतंजलीच्या केंद्रीय राज्य प्रभारी सुधा अळ्ळीमोरे, नगरसेविका संगीता जाधव, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण, पाखर संकुलाच्या शुभांगी बुवा, परिवहनचे सभापती देदिप्य वडापूरकर, नगरसेवक करली, लोकमंगल समुहाचे मनिष देशमुख, अक्कलकोटचे अतुल कोकाटे, प्रारंभ प्रतिष्ठानचे ढोल पथकाचे कार्यकर्त्यांसह आदी मान्यवर उपस्थित होते़ बाबा रामदेव यांच्या दौºयामुळे शहर व जिल्ह्यात शहर व ग्रामीण पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे़ 

देशभरातील योगसाधक सोलापूरात दाखल
योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथील फत्तेसिंह क्रिडांगणावर शनिवार १७ मार्चपासून सलग तीन दिवस योग चिकित्सा व ध्यान शिबीर होणार आहे़ या शिबीरासाठी देशभरातील योगसाधक सोलापूरात दाखल झाले आहेत़ मागील महिन्याभरापासून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटनांच्या माध्यमातून योगाचे धडे देण्याचे काम देशभरातील योगसाधकांकडून करण्यात येत आहे़ त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात योगाचा जागर करण्यात आला़ 

Web Title: Welcome to Yogguru Baba Ramdev Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.