सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:51 PM2019-01-18T12:51:19+5:302019-01-18T12:52:42+5:30

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे ...

Weighing squads for sugar factories in Solapur district on paper | सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच

Next
ठळक मुद्देवजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना २२ दिवसाखाली करण्यात आलीवजनकाटे तपासणीसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्यापथके तयार करण्याच्या सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी तशी २७ डिसेंबरच्या आदेशान्वये मंजुरी दिली

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना २२  दिवसाखाली करण्यात आली आहे. 

साखर कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांकडून सातत्याने संशय व्यक्त केल्याने मागील वर्षापासून साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. याहीवर्षी भरारी पथके तयार करण्याच्या सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी तशी २७ डिसेंबरच्या आदेशान्वये मंजुरी दिली आहे. वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलीस कर्मचारी, प्रादेशिक सहसंचालक(साखर) व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील एक शेतकरी अशी संयुक्त समिती प्रत्येक कारखान्याचा वजनकाटा तपासणी करणार आहे.  

साखर हंगाम सुरू झाल्यानंतर लागलीच या समित्या स्थापन करून कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करणे अपेक्षित आहे; मात्र तहसीलदार पातळीवर भरारी पथकांच्या समित्याही स्थापन झालेल्या नाहीत. राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांचे गुरुवातपर्यंत एक कोटी ९ लाख १८ मे.टन गाळप झाले आहे. या कालावधीत अवघ्या दोन कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यात आली आहे. गाळप हंगामाचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी भरारी पथकांची तपासणी अन्य तालुक्यात सुरू झालेली नाही. 

सूचना देऊन होतेय तपासणी
भरारी पथकाने कधीही व कोणत्याही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करणे अपेक्षित आहे; मात्र तसे होत नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील तहसीलदार, नायब  तहसीलदार किंवा अव्वल कारकुनावर वजनकाट्याची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवितात. पोलीस खात्याचा एखादा पोलीस व सोईचा शेतकरी समितीवर घेऊन कारखाना प्रशासनाला सांगून वजनकाट्याची तपासणी मागील वर्षी केली होती. यावर्षी तपासणीच झाली नाही. 

जिल्हाधिकाºयांनी वजनमापे निरीक्षक शिवाजी बागल यांच्यावर सर्व तालुक्यातील कारखाने तपासणीची जबाबदारी दिली आहे. लेखापरीक्षक पी. आर. शिंदे यांच्यावर पंढरपूर,सांगोला व माळशिरस, एन.डी. गाढे यांच्यावर बार्शी,माढा, करमाळा व मोहोळ तर के.आर. धायफुले यांच्यावर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट व मंगळवेढ्याची जबाबदारी दिली आहे.
जिल्हाधिकाºयांच्या २७ डिसेंबरच्या पत्राचा संदर्भ देत सहायक नियंत्रक वैधमापन शिवाजी बागल यांनी हीच तारीख देत प्रत्येक तालुक्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती आदेश काढला आहे. २७ डिसेंबर रोजी भरारी पथकांचा आदेश असला तरी २२  दिवसानंतरही तपासणीला मुहूर्त लागला नाही.

भरारी पथक हंगामात एकदाच तपासणी करते व साखर कारखानदारांना  तपासणीला येणार हे अगोदरच माहीत असते. यावर शेतकºयांनी एकत्रित येऊन वजनकाटा तयार करणे हाच मार्ग आहे. त्यासाठी प्रयत्न करु.
- महामूद पटेल
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
जिल्हाधिकाºयांकडून मिळालेल्या आदेशाच्या आधारे तहसीलदारांना पत्र दिले आहे. त्यांनी तालुका पातळीवर पथक तयार करावयाचे आहे. तहसीलदारांकडून अद्याप तपासणीचे निरोप नाहीत.
- शिवाजी बागल,
सहायक नियंत्रक,वैधमापन 

Web Title: Weighing squads for sugar factories in Solapur district on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.