राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:31 PM2017-12-13T15:31:16+5:302017-12-13T15:32:52+5:30

साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत.

Weakness inspection team on sugar factories, in the state's sugar factory, ignored the District Collectorate | राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देदीड महिना उलटला तरी वजनकाटे तपासणीला सुरुवातही झालेली नाही.साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी पथक तयार करण्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले साखर कारखान्यांची संख्या पाहता दोन पथकांची आवश्यकताआम्ही पुढील आठवड्यापासून वजनकाटे तपासणी करणार : शिवाजी बागल

राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणी पथक कागदावरच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष
अरुण बारसकर
सोलापूर दि १३ :  साखर कारखान्यांच्या वजनकाट्यासंदर्भात सातत्याने संशयाने पाहिले जात असून, कारखाने संशयाच्या भोवºयात सापडले जात असल्याने साखर आयुक्तांनी वजनकाटे तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्याबाबत दिलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्षित केले आहेत. साखर हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला तरी वजनकाटे तपासणीला सुरुवातही झालेली नाही.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा विषय पुढे आला होता. एक नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू होणार असल्याने साखर आयुक्त कार्यालयाने मंत्री समितीच्या बैठकीनंतर ७ आॅक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना एक पत्र दिले होते. या पत्रात साखर कारखाने वजनकाटे मारत असल्याच्या तक्रारी विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांकडून येत असतात, असे नमूद केले आहे. या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यासाठी आपल्या स्तरावर भरारी पथक नेमण्यात यावे, असे म्हटले होते. या भरारी पथकात वैधमापन शास्त्र विभाग, महसूल, पोलीस, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, असे म्हटले होते. एखाद्या कारखान्याच्या वजनकाट्याच्या गैरप्रकाराबाबत तक्रार आल्यास त्याची चौकशी करुन तत्काळ कारवाई करण्याबाबत साखर आयुक्तांच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तर कारखाने सुरू होऊन दीड महिना लोटला तरीही वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती झाली नाही. 
----------------------
 तर तपासणीची दिशा कशी ठरणार..
राज्यातील शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांच्या तक्रारी पाहता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर साखर आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकेच तयार केली नसल्याने सोलापूर जिल्ह्यात वजनकाटे तपासणीला प्रारंभही झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने असून, ३० कारखान्यांनी गाळपही सुरू केले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात मोठी साखर कारखानदारी असताना वजनकाटे तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
-------------------------
शेतकºयांकडूनच वजनकाट्याबाबत तक्रारी येत असल्याने शासकीय वजनकाटे बसविण्याची आमची मागणी आहे. ती पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वजनकाटे तपासणीसाठी पथके तयार करण्याबाबत सूचना असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. ही बाब गंभीर असून, मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणू.
- प्रभाकर देशमुख, जनहित शेतकरी संघटना
-----------------------
साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी पथक तयार करण्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले आहे. त्यांच्या आदेशाची वाट पाहतोय. साखर कारखान्यांची संख्या पाहता दोन पथकांची आवश्यकता आहे. पथकांचे काहीही होवो, आम्ही पुढील आठवड्यापासून वजनकाटे तपासणी करणार आहोत.
- शिवाजी बागल सहायक नियंत्रक, वैधमापन

Web Title: Weakness inspection team on sugar factories, in the state's sugar factory, ignored the District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.