वाळूमाफिया, खासगी सावकारी मागची गुन्हेगारी मोडून काढणार, विश्वास नांगरे-पाटील याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:14 AM2018-03-31T11:14:52+5:302018-03-31T11:14:52+5:30

Wallymafia, private banker will break the crime, trust Nangre-Patil information | वाळूमाफिया, खासगी सावकारी मागची गुन्हेगारी मोडून काढणार, विश्वास नांगरे-पाटील याची माहिती

वाळूमाफिया, खासगी सावकारी मागची गुन्हेगारी मोडून काढणार, विश्वास नांगरे-पाटील याची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपुरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना नांगरे-पाटील यांनी गँगवारने चॅलेंज दिल्याचे मान्य केलेपरिक्षेत्रात ७३ गँगवार तर ७ खासगी सावकारांवर कारवाई केली - विश्वास नांगरे-पाटील

सोलापूर : जिल्ह्यात फोफावलेल्या वाळू माफियांवर प्रभावी कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर आता दिवसाची सावकारी करून पिळवणुकीचे प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. अशा खासगी सावकारांची कुंडली काढणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी  ‘लोकमत’च्या भेटीत दिली. 

पोलीस अधीक्षक कार्यालय, वळसंग आणि मोहोळ पोलीस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीनिमित्त कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आले आहेत. लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. लोकमतचे संपादक राजा माने यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलीस कामकाजाचा आढावा घेतला. सोलापूर मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. भविष्यकाळात गंभीर परिणाम करणाºया सामाजिक घटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात वाळू माफियांचा प्रश्न मोठा आहे. यातून एक वेगळी गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. वाळूच्या तस्करीतून माया कमावलेले माफिया सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत, असे दिसून आल्याने त्यांचा बीमोड करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानंतर आता खासगी सावकारांच्या पिळवणुकीचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. अशा सावकारांवर जरब बसेल, अशी मोहीम घेण्यात येणार आहे. 

पंढरपुरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना नांगरे-पाटील यांनी गँगवारने चॅलेंज दिल्याचे मान्य केले. या गँगवारचा बीमोड करण्यासाठी टोळ्यांची माहिती तयार केली असून, लवकरच या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार आहे. मोक्काची कारवाई करून पोलीस थांबणार नाहीत तर टोळ्यांमधील म्होरक्यांनी अवैध मार्गाने जमा केलेल्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला जणार आहे. परिक्षेत्रात अशा ७३ गँगवार तर ७ खासगी सावकारांवर कारवाई केली आहे.

दारूबंदीसाठी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केले जातात, पण न्यायालयात फिर्यादी व साक्षीदार फितूर झाल्यामुळे यातील गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढे असे गुन्हे दाखल होताना महिला व सरकारी पंच घेतले जाणार आहेत. परिक्षेत्रातील दोन पोलीस ठाणी स्मार्ट करण्याचे शासनाने कळविले होते, पण आम्ही सर्वच पोलीस ठाणी स्मार्ट करीत आहोत, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. 

वाहतूक व्यवस्थापन, निर्भया पथक, डॉल्बीमुक्त अभियान, फिर्यादीला मिळालेला पोलीस ठाण्यातील प्रतिसाद आदी उपक्रमात लोकांचा सहभाग वाढत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. बापूसाहेब देशमुख, अ‍ॅड. उमेशचंद्र काजळे उपस्थित होते. 

सोलापूर जिल्हा पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता
- सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ३७ लाख असताना २६ पोलीस ठाणी व अवघे २६०० पोलीस कर्मचारी असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्याचे नियोजन करताना तारांबळ उडते. करमाळा तालुक्यासाठी व बार्शी शहरासाठी एकच पोलीस ठाणे आहे. लवकरच बार्शी तालुका पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात येणार असून, वैराग व पांगरी पोलीस ठाण्यांचा भाग जोडला जाणार आहे. परीक्षणानिमित्त वळसंग व मोहोळ पोलीस ठाण्यांचा दौरा केला. त्यानंतर शुक्रवारी सोलापुरात २२ एकरात वसलेल्या पोलीस मुख्यालयाची तपासणी केली. यात कर्मचाºयांची परेड, कर्मचाºयांचे फिटनेस, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेशोध व इतर सामाजिक घटनांचा आढावा घेतला. ग्रामीण पोलिसांचे क्युआरटी पथक चांगल्या पद्धतीने विकसित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मिळणार बंदूक
- अलीकडच्या काळात सोशल मीडियावर जातीयतेचे विष पेरणारे ग्रुप सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. गावागावांत उभारण्यात येणारे डिजिटल व अशा ग्रुपवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी सर्वच ठिकाणच्या पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यात आली आहेत. पोलीस पाटलांच्या मदतीने ग्रामसुरक्षा दले मजबूत करण्यात येणार आहेत. परिक्षेत्रातील ११३० गावात ग्रामसुरक्षा दले स्थापन करण्यात आली असून, याचे प्रमुख पोलीस पाटील राहणार आहेत. पोलीस पाटलांना प्रभावीपणे काम करता यावे म्हणून डबल बोअरच्या बंदुकीचा परवाना देण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी दिली. 

Web Title: Wallymafia, private banker will break the crime, trust Nangre-Patil information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.