विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:54 AM2019-03-22T05:54:52+5:302019-03-22T05:55:16+5:30

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे.

 Vitthal Rukmini Temple Samiti gets income of 26 crores | विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

Next

पंढरपूर -  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे.

श्री विठ्ठल मंदिरला महाराष्टÑाची काशी म्हणून समजले जाते. यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनसाठी येतात. मात्र यामध्ये श्रीमंत भाविकांपेक्षा गरीब भाविकांची संख्या जादा प्रमाणात असते.

यामुळे शिर्डीच्या साईबाबा, तिरुपतीचे बालाजी मंदिर यांच्या तुलनेने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला कमी उत्पन्न मिळते. मिळालेल्या उत्पन्नातून अर्ध्यापेक्षा जास्त खर्च होत आहे. यामुळे इतर देवस्थानच्या तुलनेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न देखील शिल्लक राहत नाही.

श्री विठ्ठल-रुक्मिणीला दान, देणगी, भक्तनिवास, पालखी सोहळा, थेट प्रक्षेपण, महावस्त्र, विविध पूजा, लाडू विक्री यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांचे वेतन, विद्युत बिल, अन्नछत्र, गो शाळा, बिल्डिंग दुरुस्ती व अन्य कारणासाठी मंदिर समितीचा खर्च होतो.
२०१७-२०१८ या अर्थिक वर्षात २६ कोटी ५६ लाख १० हजार १६ रुपयांचे उत्पन्न तर ११ कोटी ४४ लाख ६३ हजार ४६१ रुपये खर्च झाला आहे. तर २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेबुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न तर १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे.

Web Title:  Vitthal Rukmini Temple Samiti gets income of 26 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.