विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आराखडा दोन महिन्यांत, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:37 AM2019-05-06T03:37:11+5:302019-05-06T03:37:30+5:30

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुरातन विभागाच्या सूचनेनुसार विविध बदल करण्यात येणार आहेत. या कामाचा आराखडा दोन महिन्यांत तयार होणार असल्याचे पुरातन विभागाचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

 Vitthal-Rukmini temple plan in two months, inspection by officials of archaeological department | विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आराखडा दोन महिन्यांत, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आराखडा दोन महिन्यांत, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Next

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुरातन विभागाच्या सूचनेनुसार विविध बदल करण्यात येणार आहेत. या कामाचा आराखडा दोन महिन्यांत तयार होणार असल्याचे पुरातन विभागाचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील महालक्ष्मी मंदिरासमोर डोम तयार करणे, सभामंडपातील फरशी बदलणे, मंदिरातील विविध भागांना असलेला रंग काढून मूळ रूप प्राप्त करून घेणे, त्याचबरोबर मंदिरातील लोखंडी बॅरेकेटींग काढून त्याठिकाणी स्टीलची बॅरेकेटिंग करणे आदी कामे मंदिर समितीकडून होणार आहेत.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये कामे करण्यापूर्वी पुरातत्त्व विभागाकडून मंजुरी घेण्यात येते. त्यामुळे पुरातत्त्व विभागातील आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहाणी करून नवा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रंग काढून मंदिराला मूळ रूप प्राप्त होण्यासाठी काम केले जाणार आहे. पुरातत्त्व विभागाकडून सूचना आल्यानंतर तत्काळ कामास सुरुवात केली जाणार आहे.
- बालाजी पुदलवाड,
व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

Web Title:  Vitthal-Rukmini temple plan in two months, inspection by officials of archaeological department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.