नवरात्रनिमित्त विठ्ठल मंदिरातील दागिने पुन्हा गाठविले; रुक्मिणी मातेला असणार आकर्षक पोशाख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 04:33 PM2018-10-07T16:33:39+5:302018-10-07T16:39:43+5:30

दहा दिवसांपासून सुरू असलेले स्वच्छता व गाठविण्याचे काम पूर्ण

vithoba temple in pandharpur ready for navratri festival | नवरात्रनिमित्त विठ्ठल मंदिरातील दागिने पुन्हा गाठविले; रुक्मिणी मातेला असणार आकर्षक पोशाख

नवरात्रनिमित्त विठ्ठल मंदिरातील दागिने पुन्हा गाठविले; रुक्मिणी मातेला असणार आकर्षक पोशाख

googlenewsNext

पंढरपूर : नवरात्र उत्सव दोन दिवसावर आला असून या उत्सवात रुक्मिणी मातेला विविध रूपात सजविला सजविले जाते. त्यामुळे या सजावटी दरम्यान घालण्यात येणाऱ्या आकर्षक पारंपरिक दागिन्यांचे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेले स्वच्छता व गाठविण्याचे काम रविवारी पूर्ण झाले आहे. 

मंदिर समितीतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी यांना आकर्षक पोशाख घालण्यात येतो. तसेच रोज विविध प्रकारचे रुपे देऊन दागिने ही घालण्यात येतात. हे दागिने व्यवस्थित राहावेत, सुंदर दिसावेत यासाठी नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी त्यांची स्वच्छता करण्याचे काम मंदिर समितीकडून प्रत्येक वर्षी केले जाते. विठ्ठलाला घालण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये 45 दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये लहान व लाफ्फा मोठा, कौस्तुभ मनी, बाजीराव कंठी, मोत्याचा कंठा, मोर मंडोळी, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, बोरमाळ यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. 

याशिवाय रुक्मिणी मातेला ४५ ते ५० दागिने घालण्यात येतात. यामध्ये खड्याची वेणी,  मोठा व लहान मणी, मोत्याचे मंगळसूत्र, पाचोची गरसोळी, जडावाचा हार, नवरत्नचा हार, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, सोन्याचे गोठ, सोन्याचे पैंजण, मोत्याचा बिंदी, यासह अन्य दागिन्यांचा समावेश होतो. हे सर्व दागिने गाठून घेण्याचे काम व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या समक्ष पटवेकरी व सोनार यांनी मंदिरात केले आहे.

रुक्मिणी माता प्रत्येक दिवशी दिसते वेगळ्या रुपात
नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस रुक्मिणी मातेला वेगळे रूप देण्याचे काम मंदिर समितीच्या पुजाऱ्यांकडून होते. यामध्ये कमलजादेवी, सरस्वती, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, पसरती बैठक, ललिता पंचमी, कन्याकुमारी यासह अन्य रूपांचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व नित्य उपचार विभागाचे प्रमुख अतुल बक्षी यांनी दिली.
 

Web Title: vithoba temple in pandharpur ready for navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.