Violence against heart attack in Barshi; Continuing treatment in the ICU section | बार्शी येथे मतदान अधिकाºयास हृदयविकाराचा झटका; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
बार्शी येथे मतदान अधिकाºयास हृदयविकाराचा झटका; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

ठळक मुद्दे- बार्शी शहरातील राजर्षि शाहू महाराज नगरपालिका शाळा क्र ६ येथील घटना- मतदान अधिकारी सिध्दनाथ पाटील हे मुळ सोलापूर येथील रहिवाशी- पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात उपचार सुरू

बार्शी : दुसºया टप्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात मतदान सुरू असताना बार्शी शहरातील राजर्षि शाहू महाराज नगरपालिका शाळा क्र ६ येथील मतदान केंद्र क्रमांक १३५ मधील मतदान अधिकारी सिध्दनाथ निळकंठ पाटील (गजानन विद्यालय, सोलापूर, रा.बकाले नगर, सोलापूर) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 

मतदान अधिकारी सिध्दनाथ पाटील यांना तात्काळ मतदान केंद्रातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसांपासून सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी कामात आहेत. आज सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली़ त्याआधी पहाटे ५.३० पासून कर्मचारी कामात आहेत. 
----
प्रशासनाचीही तत्परता...
सिध्दनाथ पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच तात्काळ १३५ नंबर मतदान केंद्रात पर्यायीकर्मचारी दिला, तसेच सिध्दनाथ पाटील यांच्याजवळ दवाखान्यात बसण्यासाठी एका कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 


Web Title: Violence against heart attack in Barshi; Continuing treatment in the ICU section
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.