सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:55 PM2018-01-17T14:55:18+5:302018-01-17T14:57:07+5:30

पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २० जानेवारी (शनिवारी) रोजी जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार आहे.

Various programs for markandeya celebration in Solapur, Palkhi celebrations on Saturday, religious celebrations throughout the week | सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

Next
ठळक मुद्दे२१ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मद्दा मंगल कार्यालयातील गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन दि आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार उपासना महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७  : पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २० जानेवारी (शनिवारी) रोजी जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार आहे.
सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव १३ ते २० जानेवारी यादरम्यान मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १७ जानेवारी रोजी त्रिमूर्ती महिला मंडळातर्फे दुपारी ३ ते ४.३० भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सत्यसाई सेवा समितीतर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. १८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ४.३० या वेळेत उपासना महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दि आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. १९ जानेवारी रोजी शकुंतला महिला मंडळाच्या वतीने दुपारी भजन आणि सायंकाळी आर्यवैश्य कोमटी महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
२० जानेवारी रोजी मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव होणार असून, सकाळी ६ ते ८ या वेळेत विठ्ठल लोला यांच्या हस्ते महारुद्राभिषेक, सकाळी ७ वाजता पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण, सकाळी ७ ते ८ या वेळेत लोहित गद्दे यांच्या हस्ते होमहवन आणि सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार असल्याची माहिती सरचिटणीस सुरेश फलमारी यांनी दिली.
---------------------
गणेश जयंतीनिमित्त महापूजा
२१ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मद्दा मंगल कार्यालयातील गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस महापूजा आणि अभिषेक होणार आहे.

Web Title: Various programs for markandeya celebration in Solapur, Palkhi celebrations on Saturday, religious celebrations throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.