Under Punjabbadra Deshmukh Resolve Scheme, 40 thousand farmers of Solapur district got interest of Rs. 12 crore | पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये
पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये

ठळक मुद्देबँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केलेजिल्हा बँकेच्या मागणीनुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योेजनेची ७ कोटी ३३ लाख ४५ हजार २८ इतकी रक्कम बँकेला दिली

सोलापूर : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४० हजार ३८१ शेतकºयांना व्याजापोटी ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले आहेत. मात्र ९८ शाखांचे प्रस्ताव आले नाहीत.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अनुदान मागणीसाठी राष्टÑीयीकृत बँका प्रस्तावच देत नव्हत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र सर्वच २१२ शाखांचे प्रस्ताव अनुदानासाठी सादर केले होते. जिल्हा बँकेच्या मागणीनुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योेजनेची ७ कोटी ३३ लाख ४५ हजार २८ इतकी रक्कम बँकेला दिली आहे. जिल्हा बँकेच्या प्रस्तावानुसार व्याजाची रक्कम शेतकºयांना मिळाली असताना राष्टÑीय बँका मात्र दखल घेत नव्हत्या.

जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी याबाबत बँकांना वारंवार पत्र देऊन शिवाय तोंडी सांगितल्यानंतरही राष्टÑीयीकृत बँका जुमानत नव्हत्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्याजाची रक्कम मागणी प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत राष्टÑीय बँकांच्या ३३३ पैकी २०९ शाखांनी अनुदान मागणी प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार राष्टÑीय बँकांच्या कर्जदार शेतकºयांसाठी ४ कोटी ५५ लाख इतकी रक्कम जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे. एक व तीन लाख रुपयांचे कर्ज वेळेत भरणाºया ४० हजार ३८१ शेतकºयांना व्याजापोटी डॉ. पंजाबराव देशमुख योजनेतून ११ कोटी ८८ लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. 

आजही राष्टÑीय बँकेच्या १२४ शाखांचे प्रस्ताव अनुदानासाठी आलेले नाहीत, त्यामध्ये २६ शाखा निरंक आहेत. शेतीसाठी कर्ज वाटप केलेल्या ९८ शाखांचे प्रस्ताव अद्याप आले नाहीत.

राष्टÑीयच्या २६ शाखा निरंक 
च्राष्टÑीय बँकांच्या २६ शाखांचे प्रस्ताव निरंक आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या २१, आयसीआयसीआयच्या २९, बँक आॅफ बडोदाच्या १४, सेंट्रल बँकेच्या ८ व बँक आॅफ महाराष्टÑच्या चार शाखांचे प्रस्ताव अनुदानासाठी आले नाहीत. या प्रमुख बँकांव्यतिरिक्त अन्य कॅनरा, अ‍ॅक्सिस, एचडीएफसीसह १२ बँकांच्या शाखांनी व्याज अनुदान मागणी केलेली नाही. 

एकही शेतकरी व्याज अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेणार असल्याने बँकांचे प्रस्ताव सध्याही घेतले जात आहेत. बँकांनी व्याजाची रक्कम मागणी प्रस्ताव सादर करून शेतकºयांना अनुदान मिळवून द्यावे.
- अविनाश देशमुख
जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 


Web Title: Under Punjabbadra Deshmukh Resolve Scheme, 40 thousand farmers of Solapur district got interest of Rs. 12 crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.