उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 07:31 PM2018-08-21T19:31:48+5:302018-08-21T19:33:01+5:30

Ujani water supply increased rapidly, warning people alert towards Bhima river | उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Next
ठळक मुद्देउपयुक्त पाणीसाठा ९० टक्केच्या पुढे लवकरच जाण्याची शक्यता

सोलापूर : पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचे पाणीउजनी धरणात मोठया प्रमाणात येत आहे़ त्यामुळे उजनी धरणातीलपाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिला आहे़ 
उजनी धरण जलाशयातील उपयुक्त पाणीसाठी मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत ६४़९२ टक्के इतका झाला होता़ धरणाच्या वरच्या भागात मोठया प्रमाणात पाऊस चालू असून उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी येत आहे़

उपयुक्त पाणीसाठा ९० टक्केच्या पुढे लवकरच जाण्याची शक्यता उजनी धरण व्यवस्थापनाने वर्तविली आहे़ अशा परिस्थितीत पुरनियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरण सांडव्यातून भीमा नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल तरी धरणाखालील भिमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे़ तरी परिसरातील शेतकºयांनी मोटारी काढून घेणे, नदी पात्रातून व कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयावरून दळणवळणास मज्जाव करणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश करण्यात आला आहे़

Web Title: Ujani water supply increased rapidly, warning people alert towards Bhima river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.