मुळेगांव तांड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी, ६५ लोकांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 04:02 PM2018-02-23T16:02:11+5:302018-02-23T16:03:26+5:30

मुळेगांव तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकावर अवैध धंदे करणाºयांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल शेख (बक्कल नंबर २६२) व अकुलवार (बक्कल नंबर २०२१) हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली़ याप्रकरणी पोलीसांनी ६५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ 

Two policemen injured in policemen, Solapur taluka police station, 65 injured in police firing on Muldev | मुळेगांव तांड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी, ६५ लोकांविरूध्द गुन्हा दाखल

मुळेगांव तांड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी, ६५ लोकांविरूध्द गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देभानुदास तांड्यावर अचानक धाड टाकली़ या धाडीत १४ लाख ५६ हजार ४०० रूपयांची हातभट्ठी तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन पोलीसांनी नष्ट केले़ गैर कायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणून पोलीसांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़४० ते ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि देवडे हे करीत आहेत़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : मुळेगांव तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकावर अवैध धंदे करणाºयांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल शेख (बक्कल नंबर २६२) व अकुलवार (बक्कल नंबर २०२१) हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली़ याप्रकरणी पोलीसांनी ६५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ 
सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाांव तांडा (भानुदास तांडा ता़ द़ सोलापूर) येथे चालणारे अवैध धंदे दारू भट्टीवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी पोलीस ठाण्याकडील कर्मचारी, पोलीस मुख्यालयातील आरसीपीचे कर्मचारी पोलीसांनी भानुदास तांड्यावर अचानक धाड टाकली़ या धाडीत १४ लाख ५६ हजार ४०० रूपयांची हातभट्ठी तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन पोलीसांनी नष्ट केले़ 
दरम्यान, सुरेश कपूरचंद राठोड (भानुदास तांडा, ता़ द़ सोलापूर) यांच्या अवैध रित्या चालणाºया धंद्यावर पोलीसांनी धाड टाकली़ यावेळी भट्टी तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, बॅटरीच्या शेलचे तुकडे, नवसागर, युरियाचे दोन पोते, हातभट्टीने भरलेले टयुबा होत्या़ सदर गाडीजवळ चालक उभा असताना पोलीसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते गाडीसह साहित्य घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले़ या गाडीचा पाठलाग करीत असताना पोलीसांना दिपक ट्रान्सपोर्ट समोरील हायवे रोडवर ही गाडी मिळून आली़ मात्र यावेळी संबंधित गाडीजवळ असलेल्या लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणून पोलीसांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात सुभाष काशीनाथ चव्हाण, विक्रम बाबु पवार, नागेश शंकर पवार, विलास शिवाजी जाधव, सुरेश कपूरचंद राठोड, अजय पवार, लालू राठोड, सविता रमेश राठोड, इंदू राजू पवार, सनद लालू राठोड, श्रीनाथ कपूरचंद राठोड व इतर अज्ञात ४० ते ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि देवडे हे करीत आहेत़
भानुदास तांड्यावर टाकण्यात आलेल्या धाडीची कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि देवडे,पोहेकॉ गायकवाड, गुंडाळे, पवार, चवरे, टिंगरे, गवळी, पोनाकरे, कोरे, पवार, पोकॉ खांडेकर, शेख, मोटे, फडतरे, मपोना कोकणे, चासपोफौ पवार तसेच पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पथकचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई पार पाडली़

Web Title: Two policemen injured in policemen, Solapur taluka police station, 65 injured in police firing on Muldev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.