आषाढी वारीत चुरमुºयाची उलाढाल दीड कोटीवर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 04:33 PM2019-06-27T16:33:41+5:302019-06-27T16:37:25+5:30

पंढरपुरात ४० हजार पोत्यांची विक्री; पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती

Turnover of turnkey turnover in half-a-dozen ...! | आषाढी वारीत चुरमुºयाची उलाढाल दीड कोटीवर...!

आषाढी वारीत चुरमुºयाची उलाढाल दीड कोटीवर...!

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतातएक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़

प्रभू पुजारी

पंढरपूर : वर्षभरात जेवढी चुरमुºयाची उलाढाल होते, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उलाढाल केवळ आषाढी वारी सोहळ्यादरम्यान होते़ पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती असते़ पालखी सोहळ्यासह दिंड्यांमधून राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक दर्शनानंतर घरी जाताना प्रसाद म्हणून चुरमुरे घेऊन जातात़ त्यामुळे आतापासूनच पंढरपुरातील कारखान्यांत चुरमुरे बनविण्याची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

पंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने आहेत़ त्यांच्याकडूनच येथील जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतात़ ते दुकानदारांना विकतात़ शहर व परिसरात एकूण एक हजार ते बाराशे मेवामिठाईची दुकाने आहेत़ हे दुकानदार भाविकांना प्रसाद म्हणून चुरमुरे विक्री करतात़ चुरमुºयाचे कारखानदार भारत कदम माहिती देताना म्हणाले, काही व्यापारी चुरमुºयाच्या पुड्या बनवून विक्री करतात़ ते चुरमुरे बेळगाव, कोल्हापूर, गुजरात, आंध्रप्रदेश येथील असतात़ मात्र वारकºयांची पसंतीही पंढरपूर चुरमुºयालाच जास्त आहे़ हा चुरमुरा प्रसाद म्हणून वापरला जातोच; पण भेळ, चिवडा, सुसला आदी पदार्थही बनविता येतात़ कच्चा माल म्हणजेच तांदूळ हा मध्यप्रदेश, कर्जत चौक, खालापूर येथून आणला जातो़ आता या व्यवसायातही अत्याधुनिक मशिनरी आल्या आहेत़

अशी आहे उलाढाल
- एक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़ त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यातील १५ दिवस वगळता वर्षभरातील ३६५ पैकी ३५० दिवसांत रोज १०० पोत्यांप्रमाणे ३५ हजार पोते होतात़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल होते़ ही वर्षभराची आकडेवारी आहे़ मात्र आषाढी कालावधीत ४० हजार पोत्यांची विक्री होते़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल होते.

अशी आहे चुरमुरे बनविण्याची प्रक्रिया
- प्रथम रत्ना भात (तांदूळ) किमान आठ तास शिजविला जातो़ त्यानंतर तो भाजून त्यावर पाणी मारणे, पुन्हा थंड करणे, मग पॉलिश करणे, त्यातून तांब व तांदूळ विभक्त करणे़ नंतर ते तांदूळ सुकण्यासाठी टाकणे़ नंतर मशीनमध्ये टाकणे, त्यात मीठ मिक्स करणे़ मशीनमध्ये (रोष्टर) भाजणे़ त्यानंतर बलोटद्वारे हवेत उडविणे़ नंतर सेंट्री चाळणीने स्वच्छ करणे़ शेवटी ते पोत्यामध्ये भरणे, ही याची प्रक्रिया असते.

पंढरपुरी चुरमुºयाचे वैशिष्ट्य
- पंढरपुरी चुरमुरे हे खुसखुशीत असतात़ शिवाय चविष्टही आहेत़ प्रसादाबरोबरच घरात चिवडा, भेळ, सुसला तयार करता येतो़ वृद्धांनाही पंढरपुरी चुरमुरे सहजासहजी खाता येतात़ या वैशिष्ट्यामुळे पंढरीत आलेला प्रत्येक भाविक आवर्जून पंढरपुरी चुरमुरे घेऊन जातोच, असे अनेक व्यापाºयांनी सांगितले़

Web Title: Turnover of turnkey turnover in half-a-dozen ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.