सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 3:30pm

वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला.

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९ : वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला. पहिली घटना डफरीन चौक तर दुसरी रंगभवन परिसरात घडली.  त्याचे असे झाले. आज सकाळी डफरीन चौकामध्ये वाहतूक पोलीस संपत उंदा कारभळ यांची वाहतुक नियमनासाठी नियुक्ती केली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास जुना एम्प्लायमेंट चौकातून अविनाश गायकवाड (रा. सेटलमेंट, सोलापूर) डफरीन चौकातून सिग्नल तोडून पार्क चौकाकडे निघाला होता. पोलीस कारभळ याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन गाडी थांबवून परत येत मानेला पकडून पोटास मारहाण केली. यात पोलिसास मुका मार लागल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना रंगभवन चौक परिसरात घडली. अशोक पोलीस चौकीला नेमणूक असलेले फौजदार दत्तात्रय विठ्ठल मोरे अरविंद धाम येथून रंगभवनमार्गे चौकीकडे जात होते. या दरम्यान, रंगभवन चौकातून न्यायालयाकडे जात असताना राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला विचारताना रिक्षाचालकाने तू कोण अशी विचारणा करताना मोरे यांनी आपण फौजदार असल्याची ओळख दिली. दोघात बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने गाडी बाजूला लावून मोरे याच्या तोंडावर ठोसे मारुनजखमी केले. एकाचवेळी सकाळी ११ च्या दरम्यान शासकीय कामात अडथळा केला. सिव्हील पोलीस चौकीत दोन्ही घटनांच्या नोंदी झाल्या आहेत.

संबंधित

तीन रुपये दरवाढीनंतरही दूध आंदोलन सुरू
शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या
बेभरवशाच्या पावसाने खरीप क्षेत्र जैसे थे!
सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर! सोलापूर महापालिकेचा उच्च न्यायालयात अहवाल
रत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचले

सोलापूर कडून आणखी

मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा
गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन
विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा
सोलापूरच्या लोकअदालतीत ९७५ प्रकरणे तडजोडीने निकाली
आषाढी वारी ; अन्न व औषध प्रशासन सतर्क

आणखी वाचा