ज्यांची देशावर, पक्षावर निष्ठा नाही ते देशद्रोहीच  : सहकारमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 08:11 PM2019-03-25T20:11:45+5:302019-03-25T20:13:56+5:30

माढा लोकसभा मतदारसंघातील देगाव (ता. पंढरपूर) येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

Those who do not have loyalty to the country and the country, are the traitors. The Cooperative Minister | ज्यांची देशावर, पक्षावर निष्ठा नाही ते देशद्रोहीच  : सहकारमंत्री

ज्यांची देशावर, पक्षावर निष्ठा नाही ते देशद्रोहीच  : सहकारमंत्री

Next
ठळक मुद्देसत्तेसाठी भाजपशी जवळीक केलेल्या डुप्लिकेट लोकांना नागरिकांनी ओळखून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे - सुभाष देशमुखकाँग्रेस व राष्टÑवादीने जनतेला मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. मागच्या काळातील सर्व चोरांनी रस्त्याची कामे फक्त कागदावरच केली - सुभाष देशमुख

पंढरपूर : ज्यांची देशावर आणि पक्षावर निष्ठा नाही, त्यांना मी देशद्रोही समजतो.  आजपर्यंत सत्तेच्या लालसेमुळे जे डुप्लिकेट लोक आपल्यामध्ये सहभागी होते, ते आता निवडणुकीच्या तोंडावर उघडे पडू लागलेले आहेत. सत्तेसाठी भाजपशी जवळीक केलेल्या डुप्लिकेट लोकांना नागरिकांनी ओळखून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

माढा लोकसभा मतदारसंघातील देगाव (ता. पंढरपूर) येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी  एमएससी बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, उद्योजक अभिजित पाटील, अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, देगावचे सरपंच शांतीनाथ रणदिवे, अजय जाधव, अनंता चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस व राष्टÑवादीने जनतेला मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. मागच्या काळातील सर्व चोरांनी रस्त्याची कामे फक्त कागदावरच केली, प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डेच दिसायचे, अशी टीका सुभाष देशमुख यांनी केली. आभार उद्योजक अमर पाटील यांनी मानले. 

Web Title: Those who do not have loyalty to the country and the country, are the traitors. The Cooperative Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.