जाणून घ्या... सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची पाच कारणे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:13 PM2019-05-24T12:13:41+5:302019-05-24T12:15:31+5:30

लोकन्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे - सुशीलकुमार शिंदे

These are the five reasons of defeat of Sushilkumar Shinde .... | जाणून घ्या... सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची पाच कारणे....

जाणून घ्या... सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची पाच कारणे....

Next
ठळक मुद्दे- काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव- भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केला शिंदेचा पराभव- भाजप- शिवसेनेने सोलापूर शहरासह ग्रामीण भागात केला विजयोत्सव

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा दुसºयांदा पराभव झाला़ यंदाच्या निवडणुकीत भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी तब्बल दीड लाखांच्या मतांनी विजय मिळवित शिंदेंचा पराभव केला़ ‘लोकमत’ च्या सर्वेक्षणातून सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची काय आहेत कारणे ते पहा...

  • - गत निवडणुकीनंतर तुटलेला मतदारसंघाशी संपर्क़
  • - सोलापूर मनपा, जि़ प़ आणि ऩ प़ निवडणुकीत शिंदे यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले़
  • - संघटनात्मक बांधणी करण्यात अपयश़ अनेक वर्षे तेच पदाधिकारी राहिले पदावऱ
  • - कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जनसंपर्काचा अभाव. मतदारांचा कल ओळखण्यात आलेले अपयश.
  • - सर्वच तालुक्यात काँग्रेस अंतर्गत गटबाजी़ ही गटबाजी शमवण्याचा प्रयत्न झाला नाही़ 

विजयी उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे अभिनंदन. मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला चांगले मतदान केले, त्यांचा मी ऋणी आहे. लोकन्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे.    
- सुशीलकुमार शिंदे, कॉँग्रेस


 

Web Title: These are the five reasons of defeat of Sushilkumar Shinde ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.