अपघातातील मृतदेहाचे १७ तासानंतरही पोस्टमार्टम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:24 PM2019-06-08T13:24:31+5:302019-06-08T13:27:43+5:30

रूग्णालयास ठोकले कुलूप ; संतप्त नातेवाईकांचा टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ

There is no post-mortem after 17 hours of accidental dead body | अपघातातील मृतदेहाचे १७ तासानंतरही पोस्टमार्टम नाही

अपघातातील मृतदेहाचे १७ तासानंतरही पोस्टमार्टम नाही

Next
ठळक मुद्दे- वैद्यकीय अधिकारी नसल्याने पोस्टमार्टम होण्यास अडचण- आढेगाव येथे काल शुक्रवारी झाला होता अपघात- अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाले होते

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील आढेगाव येथील अपघातात मयत झालेल्या तरुणांचे तब्बल १६ तासानंतरही पोस्टमार्टम न केल्याने मृतदेह टेंभुर्णी पोलिस स्टेशनसमोर ठेवून नातेवाईकांनी आंदोलन चालू केले़ यावेळी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयास जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अपघात शुक्रवार दिनांक ७ रोजी सायंकाळी ८.३० वाजता झाला होता. मोटारसायकलवरून जाणाºया तरुणांना ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात आढेगाव येथील बापू आण्णा चव्हाण (वय १८) हा जागीच ठार झाला होता तर त्याचा जोडीदार दीपक महादेव चव्हाण (२५)हा गंभीर जखमी झाला आहे़ त्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार आहेत.

मागील तीन महिन्यांपासून टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत़ वारंवार मागणी करूनही जिल्हा आरोग्य अधिकाºयाने संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल आॅफिसरची नेमणूक न केल्याने त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते करत आहेत़ मयताच्या नातेवाईकांनी व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टेंभुर्णी प्रथमीक आरोग्य केंद्रास कुलूप लावले आहे. 





 

Web Title: There is no post-mortem after 17 hours of accidental dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.