Ten people, including workers leader Shrishil Gaikwad, were killed by the police, the kind of Solapur Municipal Corporation | कामगार नेते श्रीशैल गायकवाडसह दहा जणांना पोलीसांचा बेदम चोप, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार
कामगार नेते श्रीशैल गायकवाडसह दहा जणांना पोलीसांचा बेदम चोप, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार

ठळक मुद्देघंटागाडीवरील कर्मचाºयांना किमान वेतन द्यावं या मुद्यावरून गेले काही दिवस कामगार संघटना आणि पालिका प्रशासन यांच्यात चर्चाघंटागाडीवरील रोजंदारी कर्मचारी सध्या संपावरही आहेत या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आंदोलन सुरू महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते़ घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी महापालिकेत पोहोचले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाºया कामगार पुढारी श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़  या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़
घंटागाडीवरील कर्मचाºयांना किमान वेतन द्यावं या मुद्यावरून गेले काही दिवस कामगार संघटना आणि पालिका प्रशासन यांच्यात चर्चा वादविवाद सुरू आहेत़ घंटागाडीवरील रोजंदारी कर्मचारी सध्या संपावरही आहेत या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आंदोलन सुरू असताना  मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न कामगार नेत्यांनी केला़ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास श्रीशैल गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी घोषणा देत सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रभुवनातील आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले़ यातील दोघांनी काही कळण्यापूर्वीच अंगावर रॉकेल ओतून घेतले़ तर श्रीशैल गायकवाड व इतरांनी आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्यासाठी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला़ यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत जमाव पांगवला़ आंदोलक घोषणा देऊ लागल्यावर पोलीसांना लाठीचार्जही करावा लागला़ यावेळी आयुक्त कार्यालयाच्या पोर्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी हुज्जत घालणाºया श्रीशैल गायकवाड यांना पोलीसांना चांगलाच चोप दिला व सर्वांना ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाण्याकडे रवानगी केली़ या प्रकारामुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते़ घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी महापालिकेत पोहोचले होते़


Web Title: Ten people, including workers leader Shrishil Gaikwad, were killed by the police, the kind of Solapur Municipal Corporation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.