ठळक मुद्देम्हाळुंगमधील यमाईदेवी मंदिराचे बांधकाम प्राचीन आहेया मंदिराचा सर्व ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिरासमोरील जुन्या वास्तूला धोकाजुनी पुरातन दीपमाळा पडण्याच्या मार्गावर


आॅनलाइन लोकमत सोलापूर
श्रीपूर दि ११ : माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील यमाईदेवी मंदिरासमोरील बारव ढासळला असून, त्याच्याजवळ असलेली जुनी पुरातन दीपमाळा पडण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिरासमोरील जुन्या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. 
म्हाळुंगमधील यमाईदेवी मंदिराचे बांधकाम प्राचीन आहे. या मंदिराचा सर्व ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे. येथील ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही. साधी डागडुजी करायची असेल तर पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. यमाईदेवी मंदिरात नवरात्रीत सलग नऊ दिवस मोठा जागर असतो़ अनेक भाविक नऊ दिवस मंदिर परिसरात राहतात़ देवीची पूजाअर्चा करतात, पण जे भाविक नऊ दिवस उपवास करीत मंदिर परिसरात राहतात, त्यांची राहण्याची सोय व्यवस्थित नाही़ ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून भक्तनिवास नाही.
गेल्या दोन वर्षांपासून थोडा-थोडा ढासळत असलेला बारव दुरूस्तीसाठी पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार केला़ तसेच गेल्यावर्षी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामार्फत दिल्ली येथे पुरातत्व खात्याचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते़ पण एक वर्ष झाले तरी कोणतीही दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ गावकºयांच्या वतीने म्हाळुंग ग्रामसभेचा ठराव करण्यात आला़ त्यामध्ये बारव (विहीर) दुरूस्ती करणे, दीपमाळा दुरूस्ती, भक्तनिवास बांधणे, मंदिराभोवती फरशा बसविणे, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार यांचा समावेश करून पुरातत्व विभाग मुंबई व दिल्ली येथे दिले आहे़ याबाबतचे निवेदन शामराव भोसले, राजाराम काळे, राजकुमार शिंदे, पोपट चव्हाण व ग्रामस्थांनी पाठविले आहे़
-------------
तीन महिन्यांच्या आत पुरातत्व विभागाने दुरूस्तीची कामे केली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ लोकवर्गणीतून काम चालू करणार आहे.
- रमेश देवकर,
माजी ग्रामपंचायत सदस्य म्हाळुंग 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.