विधानसभेसाठी सोलापूरच्या सहा नव्हे अकरा जागा टारगेट करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:07 PM2018-12-21T14:07:44+5:302018-12-21T14:09:24+5:30

विधानसभा निवडणूक तयारी : 

Target sixteen eleven seats for the assembly in Solapur; Chief Information of Chief Minister | विधानसभेसाठी सोलापूरच्या सहा नव्हे अकरा जागा टारगेट करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

विधानसभेसाठी सोलापूरच्या सहा नव्हे अकरा जागा टारगेट करा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सोलापुरातील भाजप पदाधिकाºयांची आढावा बैठक घेतलीबुथ सक्षमीकरण, आदिवासी विकासरथ, विविध योजनांचा प्रचार याचे काम कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख अनुपस्थित

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सहा नव्हे सर्व अकरा विधानसभा यशस्वी करण्याचे टारगेट ठेवून काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भाजपच्या पदाधिकाºयांना दिल्या. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सोलापुरातील भाजप पदाधिकाºयांची आढावा बैठक घेतली. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सोलापुरात येऊन घेतलेल्या कस्ट्रल बैठकीबाबत माहिती घेतली. बुथ सक्षमीकरण, आदिवासी विकासरथ, विविध योजनांचा प्रचार याचे काम कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा घेतला.

सरकारने चांगली कामगिरी केली आहे. ही कामगिरी लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी सोलापूर लोकसभा व दक्षिण, उत्तर सोलापूर, शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर हे विधानसभा मतदार संघ टारगेट ठेवून काम सुरू असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुसते हेच मतदार संघ नको तर सोलापूर व माढा लोकसभा आणि सर्व म्हणजे अकरा विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे टारगेट ठेवून काम करा अशा सूचना दिल्या. जागा व उमेदवार या बाबी पक्षाच्या प्रदेश पातळीवर ठरतील. पण आपण मतदारसंघ कसे वाढतील यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर सहकारमंत्री देशमुख यांनी या पद्धतीने काम करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

पालकमंत्री अनुपस्थित
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख अनुपस्थित होते. याच वेळात पुण्यात आयटी पार्कसंबंधी असलेल्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली. यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेला वडार समाजाचा मेळावा व त्यामध्ये त्यांनी केलेल्या घोषणा आणि त्यानंतर सोलापूर पदाधिकाºयांची ही बैठक घेतली.

Web Title: Target sixteen eleven seats for the assembly in Solapur; Chief Information of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.