रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:10 PM2018-01-20T12:10:20+5:302018-01-20T12:14:42+5:30

टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

On Sunday, water supply to Solapur city for four days, water from Ujani leaves water | रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

Next
ठळक मुद्देशहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झालेउजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 
शहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात आला आहे. टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झाले आहे. यातून शनिवारी एक दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर उजनीतून सोडलेले पाणी औज व तेथून चिंचपूर बंधाºयात येईपर्यंत हा बदल लागू करण्यात आला आहे. उजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. यातून औज व चिंचपूर बंधाºयात पुरेसा साठा होईपर्यंत टाकळीचे काही पंप बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुरेसा पाणी उपसा होणार नसल्याने शहराला तीन ऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. 

Web Title: On Sunday, water supply to Solapur city for four days, water from Ujani leaves water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.