परीक्षेत कॉफी करताना पकडलं म्हणून विद्यार्थ्यांनी सुपरवायझरला केली मारहाण, सांगोला येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 3:55pm

परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १० : परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़ सोलापूर विद्यापीठाच्याच्या वतीने सध्या बीए़ बीकॉमच्या परीक्षा सुरू आहेत़ परीक्षा सुरू असताना सांगोला येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे बीकॉम २ च्या परीक्षेवेळी पेपर सुरू असताना सुपरवायझर सुयोग शशिकांत दिवटे (वय २५ रा़ वासुद रोड, सांगोला)यांना सुनिल संतोष पाटील (वय २३, रा़ पाटील वस्ती सांगोला) हा विद्यार्थी कॉपी करत असल्याचं आढळून आले़ त्यानंतर सुपरवायझर दिवटे यांनी विद्यार्थी सुनिल पाटील यास कॉपी करण्यास प्रतिबंध केला व नंतर त्यांचा पेपर काढून घेतला़ यानंतर चिडलेल्या विद्यार्थ्यांने सुपरवायझर दिवटे यांना शाळेबाहेर गाठून कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली़या सुपरवायझर सुयोग दिवटे यांच्या छातीवर, डोक्यात, दंडावर, पायावर जखमा झाल्या आहेत़  या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात झाली आहे़ पुढील तपास पोना कांबळे हे करीत आहेत़ 

संबंधित

कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, शेतकºयांना महावितरणचा दिलासा
बदाम समजून खाल्ल्या एरंडेलच्या बिया, सोलापूरातील चार मुले रुग्णालयात दाखल 
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे, चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे
अकलूजच्या घोडेबाजारात पावणेतीन कोटींची उलाढाल
दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी शेतक-यांना १० वर्षांची मुदत द्या - शरद पवार

सोलापूर कडून आणखी

कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार
शिक्षकांनी उपक्रमशीलतेतून विद्यार्थी घडवावेत, प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हा शिक्षण परिषदेची आढावा बैठकीत सचिवांनी दिल्या विविध सुचना
मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार
सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनी दिली ‘शिवशाही’ला पसंती, दोन गाड्यांची झाली वाढ
राज्यात विक्रम; सोलापूर जिल्ह्याचे शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण, १ लाख १२ हजार शौचालय बांधकाम पूर्ण !

आणखी वाचा