उभ्या ट्रकला टेम्पोने दिली धडक; दोन ठार, तिघे जखमी; मोहोळ येथील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:14 PM2018-12-28T13:14:10+5:302018-12-28T13:15:34+5:30

मोहोळ : मार्गात उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची धडक बसून दोन ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना ...

Strike by vertical truck tempo; Two killed, three injured; Accident of Mohol | उभ्या ट्रकला टेम्पोने दिली धडक; दोन ठार, तिघे जखमी; मोहोळ येथील दुर्घटना

उभ्या ट्रकला टेम्पोने दिली धडक; दोन ठार, तिघे जखमी; मोहोळ येथील दुर्घटना

Next
ठळक मुद्देजखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूर येथे पाठविलेमहामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होतीवाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली

मोहोळ : मार्गात उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची धडक बसून दोन ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी २७ डिसेंबरच्या पहाटे साडेपाच वाजता सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ उड्डाण पुलावर घडली.

अली उर्फ अलाउद्दीन महामूद सुभान शेख (रा. इटकळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), चाँद बाबुलाल नदाफ (रा. लोहगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये फर्जाना चाँद नदाफ आणि त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व जण लोहगाव (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत. मोहोळ पोलीस व राष्ट्रीय आपदामोचन बल पाच क्रमांकाच्या वाहिनीने केलेल्या तत्काळ मदतीमुळे या तिघांचे प्राण वाचले.

 याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अली उर्फ अलाउद्दीन शेख हे आयशर टेम्पो क्रमांक (एम.एच. ४६ ए.आर. ६५१४) घेऊन सोलापूर-पुणे महामार्गावरून हैदराबादकडे निघाले होते. २७ डिसेंबरला पहाटे साडेपाच वाजता त्यांचा टेम्पो मोहोळ शहरातील उड्डाण पुलावर आला असता महामार्गाच्या ऐन मधोमध मालट्रक (एम.एच. १० झेड. ३२१३) बंद स्थितीत उभा होता. त्याला टेम्पोची पाठीमागून धडक बसल्याने टेम्पोचालक अली उर्फ अलाउद्दीन शेख जागीच ठार झाला. तर टेम्पोमध्ये बसलेले चाँद बाबुलाल नदाफ याचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस हवालदार अविनाश शिंदे, शिपाई लखन घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु आयशरची पुढील बाजू पूर्णपणे दबली होती. दरम्यान, याच मार्गावरून पुण्याहून राष्ट्रीय आपदामोचन बल क्रमांक पाच वाहिनी सुंदुबरे वाहनातील टीमने मदतीसाठी धाव घेतली आणि बचाव कार्य केले.

या अपघातात आयशर टेम्पोच्या केबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. या अपघातप्रकरणी भररस्त्यात धोकादायक स्थितीत ट्रक उभा करणाºया चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनडीआरएफ टीम धावली देवासारखी..!
च्याच दरम्यान पुण्याहून राष्ट्रीय आपदामोचन बल क्रमांक पाच वाहिनी सुंदुबरे हे वाहन जात होते. अपघात झाल्याचे व बचाव कार्य सुरू असल्याचे दिसताच एनडीआरएफ टीमचे कमांडर उपनिरीक्षक बिपीन बिहारी सिंह यांनी थांबून मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या २२ सहकाºयांनी गाडीतील अत्याधुनिक कटरद्वारे काही मिनिटातच आयशर टेम्पोची बॉडी कट करून आतील सर्व जखमींसह एका सहा महिन्यांच्या व दीड वर्षाच्या अशा दोन बालकांचे प्राण वाचवले. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूर येथे पाठविले. 

Web Title: Strike by vertical truck tempo; Two killed, three injured; Accident of Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.