सोलापूर  :  अच्छे दिन,  आणि गरिबी दूर करण्याचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून गरिब जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे . असे असताना आता अनुदानित गॅसच्या दरात ४. ५६ रुपये तर विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात तब्बल ९३ रुपयांची वाढ करून देशभरातील महिलावर्गांना महागाईने होरपळून काढले आहे. गॅस दर वाढीने गृहिणींचे किचन बजेट कोलमडून पडले आहे. या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली . तसेच महिलांना चुली वाटून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. 

दरम्यान गॅस नको आता चुलचं  द्या आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना देण्यात आले. वापस करो , वापस करो , पुराणे दिन वापस करो , नही चाहिये, नही चाहिये , मोदी के अच्छे दिन नही चाहिये, गॅस दरवाढीचा धिक्कार असो, गॅस दरवाढ थांबवा नाहीतर खुर्च्या खाली करा, महिलांना खोटी स्वप्ने दाखवूना-या सरकारचा धिक्कार असो, गरिबांना लुटना-या बनिया सरकारचा धिक्कार असो,स्वच्छ इंधन , बेहतर जीवनची खोटी जाहिरात करना-या सरकारचा धिक्कार असो, बहोत हुई फेकू कि बात , अब हम  देंगे एक एक लाथ  आदी भाजप सरकारविरोधी घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे, 

माजी उपमहापौर मंगलाताई कोल्हे,लता ढेरे, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे,  सायरा शेख,गौरम्मा कोरे,सत्यभामा उत्तरे , रेखा अलकुंद , मुक्ताबाई कारंडे,कमल गायकवाड,शिया मुलानी , संगीत सोनवणे,उज्वला भोसले,मनीषा घोडके,छाया पवार , लक्ष्मी केदार,प्रमिला वाघमारे,अनिता मठपती, स्मिता तोडकर,पुष्पा चव्हाण,जया साबळे,संगीता आनुषे  यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.