राज्यातील साखर कारखान्यांना राज्य बँकेचे सहकार्य, १२०० कोटींची केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:30 PM2018-10-11T12:30:28+5:302018-10-11T12:32:01+5:30

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला आहे.

State Bank's support to sugar factories, Rs. 1200 crores, helped the state's sugar factories | राज्यातील साखर कारखान्यांना राज्य बँकेचे सहकार्य, १२०० कोटींची केली मदत

राज्यातील साखर कारखान्यांना राज्य बँकेचे सहकार्य, १२०० कोटींची केली मदत

Next
ठळक मुद्देसाखर कारखानदारीला मदत करण्याचे सरकारचे धोरणराज्य सहकारी बँकेने गरजू कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी कर्ज पुरवठा केला सोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस विलाची थकीत रक्कम दिली

सोलापूर :  आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला आहे . गळीत हंगामासाठी १२०० कोटींची कर्जे देण्यात आली असून सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याला ४० कोटींची मदत देऊन थकीत एफआरपी चुकती करण्यासाठी हातभार लावला आहे.

साखरेचे भाव कोसळल्याने राज्यातील अनेक कारखान्यांनी साखर विक्री केली नव्हती , परिणामी शेतक?्यांच्या ऊस बिलाची एफआरपी देताना त्यांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागले . राज्यभरातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सक्षम नसल्याने अनेक कारखान्यांनी एफ आर पी ची थकीत रक्कम दिली नव्हती .  सरकारने वारंवार कारखान्यांना तंबी देऊनही फारसा फरक पडला नव्हता .  कारखाने साखरेचा भाव कोसळल्याने आपली आर्थिक कोंडी झाल्याचे वारंवार सांगत होते मात्र केंद्र सरकारने साखरेला २९००  रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केल्याने साखर कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.

साखर विक्री साठी कोटा पद्धत असल्याने एकाच वेळी साखरेची विक्री करता येत नाही ,  हे कारण देखील कारखानदारांनी पुढे केले त्यामुळे साखरेला हमीभाव मिळूनही एफ आर पी ची रक्कम देण्यात काही कारखाने अपयशी ठरले आहेत अशा कारखान्यांना गाळप परवाना देणार नाही असा फतवा राज्याच्या साखर आयुक्तांनी काढला मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही अखेर साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न सहकार खात्याच्या पुढाकाराने झाला. 
--------
  राष्ट्रीयकृत बँकांचा नकार
एकेकाळी साखर कारखानदारीला मुबलक कर्जपुरवठा करणा?्या राष्ट्रीयकृत बँकांनी अलीकडे आखडता हात घेतला आहे त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांची सारी भिस्त आता सहकारी बँकावर अवलंबून  आहे . राज्य सहकारी बँकेने सहकारी आणि खासगी कारखान्यानाही अर्थसाहाय्य करून हातभार लावला आहे. 
----------
१२०० कोटींचा कर्जपुरवठा
राज्यातील साखर कारखानदारीला उभारी येण्यासाठी राज्य सहकारी बँकेने चालू गळीत हंगामासाठी १२०० कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे  . यात सांगली  , सातारा ,  कोल्हापूर  , सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची संख्या अधिक असून रक्कम ही जास्त आहे  . या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील कारखाने आणि कर्जाच्या रकमा कमी आहेत. 
------
सिद्धेश्वरला ३९.६०  कोटी कर्ज
सोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस विलाची थकीत रक्कम दिली नाही या कारखान्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन एफ आर पी अदा करण्यासाठी राज्य बँकेने कर्ज दिले आहे सिद्धेश्वर कारखाना कुमठे ३९.६०  कोटी , आदिनाथ ,करमाळा २० कोटी , स . म . मोहिते-पाटील अकलूज ४८.६५  कोटी , संत शिरोमणी काळे भाळवणी  २४.६४ कोटी , विठ्ठल पंढरपूर  ५४ कोटी , विठ्ठल कापोर्रेशन  २१ कोटी  , संत दामाजी मंगळवेढा  १९.२८ कोटी  , मकाई वांगी  ११.२० कोटी ,  भीमा टाकळीसिकंदर  ६५ कोटी , लोकमंगल भंडारकवठे  ४० कोटी , लोकमंगल बीबीदारफळ २० कोटी कर्जपुरवठा केला आहे .
---------
साखर कारखानदारीला मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे त्याच भूमिकेतून राज्य सहकारी बँकेने गरजू कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी कर्ज पुरवठा केला आहे याबाबत बँकेचे उदार धोरण आहे
      अविनाश महागावकर
प्रशासकीय संचालक , राज्य सह. बँक , 

Web Title: State Bank's support to sugar factories, Rs. 1200 crores, helped the state's sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.