सोलापूरची विनिता सोनवणे दिसणार मोठया पडद्यावर, प्रेमरंग मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 09, 2018 3:20pm

चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे़

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९  : चित्रपट सृष्टीची भुरळ सर्वानाच आहे़ येथे काम मिळावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू ते पूर्णत्वास जाईलच असे नाही, परंतू मुळची सोलापूर शहरातील व सध्या पुण्यात स्थायिक झालेली सामान्य कुटुंबातील विनिता सोनवणे या जिद्दी युवतीने हे स्वप्न प्रबळ इच्छेच्या जोरावर पूर्ण केले असून मराठी चित्रपटात पदार्पन केले आहे़ ब्रँड अ‍ॅम्बिसेंडर आॅफ साहिल ग्रुप व नक्षत्रची मॉडेल असलेली विनिता सोनवणे हिला प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक शरद गोरे, पटकथा लेखक रवींद्र जवादे यांच्या प्रेमरंग या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे़ सुप्रसिध्द अभिनेता बंटी मेंढके, हिंदी चित्रपटातील नायिक रेहीना गिंग, मराठीतील अश्विनी सुरपुर, निलोफर पठाण, मेहेक शेख, पंकज जुनारे व नाटक कलेतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमाकांत सुतार यांची प्रमुख भूमिका असणाºया चित्रपटात विनिता सोनवणे ने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे़ महाबळेश्वर, वाई, सातारा, कोकणात पार पडलेल्या चित्रिकरणामध्ये विनिताने आपल्या अभिनयकलेने सर्वांना भुरळ पाडली आहे़ चित्रपटाचे सहनिर्माता विशालराजे बोरे, अशिष महाजन असून चित्रपटात प्रसिध्द कलाकारांसोबत काम करायची संधी विनिताला मिळाली आहे, प्रेमरंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे़ ---------------- विनिता सोनवणे हिचा असा आहे प्रवास़़़़़़़ विनिता सोनवणे ही मुळची सोलापूर शहरातील आहे़ तिचे प्राथमिक व माध्यामिक शिक्षण सोलापूरातच पूर्ण झाले़ चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या जिद्दीने विनिताने पुणे गाठले़ विनिताने पुण्यात चित्रपटसृष्टीचे करिअर घडवत पुण्यातील जनक्रांती महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले़ विनिताला महाविद्यालयीन स्तरावर असणाºया युवा महोत्सवातून अनेक प्रकारात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली़ त्यातूनच विनिता हिची चित्रपटासाठी काम करण्याची आॅफर आली़ तिने आजपर्यंत दर्द, जर्नि आफ डेथ या हिंदी तर मनाची कावड या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे़ 

संबंधित

शिलाई मशीन चोरीस गेल्यावर रोजचा व्यवसाय बंद पडला; संभाजी ब्रिगेडनं नवं मशीन देताच कारागीर आनंदाने रडला !
राज्यातील बेरोजगारांच्या आत्महत्या चिंताजनक : सत्यजित तांबे
बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड
प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा
राज्यातील नऊ ‘एचआयव्ही’बाधित जोडप्यांचं व्हॅलेंटाईन दिनी मेळाव्यात ठरलं लग्न !

सोलापूर कडून आणखी

शिलाई मशीन चोरीस गेल्यावर रोजचा व्यवसाय बंद पडला; संभाजी ब्रिगेडनं नवं मशीन देताच कारागीर आनंदाने रडला !
राज्यातील बेरोजगारांच्या आत्महत्या चिंताजनक : सत्यजित तांबे
बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड
प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा
राज्यातील नऊ ‘एचआयव्ही’बाधित जोडप्यांचं व्हॅलेंटाईन दिनी मेळाव्यात ठरलं लग्न !

आणखी वाचा