सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:41 PM2017-11-18T12:41:26+5:302017-11-18T12:46:02+5:30

उसाचा दर ठरविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलावण्यात आलेली दुसरी बैठक निष्फळ ठरली असून उसाचा प्रश्न चिघळू लागला आहे.

Solidarity problem in Solapur district, farmers' agitation aggressive: factories firm, administration hattal | सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल

Next
ठळक मुद्देकारखानदारांनी दिला जिल्हाधिकाºयांना दोन दिवसांचा अल्टिमेटमअन्यथा कारखाना बंद ठेवण्याचा इशारा; विविध शेतकरी संघटना आक्रमकऊस दराबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नाही : तुपकर


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : उसाचा दर ठरविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात  बोलावण्यात आलेली दुसरी बैठक निष्फळ ठरली असून उसाचा प्रश्न चिघळू लागला आहे.  इकडे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून  त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.  कारखानदारही आपल्या मतावर ठाम असून प्रशासनाची मात्र यात गोची झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला असून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसाचा अवधी दिला आहे. 
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये ऊसदराचा प्रश्न मिटला आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यात तो उग्ररुप धारण करीत आहे. आठ दिवसांपूर्वी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुण्यामध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखानदारांनी  ऊसदरावर ठाम भूमिका घेतल्याने बैठकीत तोडगा निघाला नाही़ 
----------------------
कारखाने बंद ठेवता येणार नाहीत
कारखानदारांनी कारखाने बंद ठेवू असे सांगितले असले तरी लेखी दिलेले नाही. कायद्याप्रमाणे त्यांना कारखाने बंद ठेवता येत नाहीत. कायद्याप्रमाणे एफआरपी दर देणे एवढेच कारखानदारांना बंधनकारक आहे. जिल्ह्यात पुरेसा बंदोबस्त आहे. शेतकरी संघटनांनाही कायद्याच्या चौकटीत आपल्या मागण्या ठेवण्यास सांगितले आहे. बैठकीचा अहवाल पालकमंत्री, सहकारमंत्री यांच्यासह शासनाला पाठवू.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.
--------------------------
- कारखानदारांनी दिला जिल्हाधिकाºयांना दोन दिवसांचा अल्टिमेटम
- अन्यथा कारखाना बंद ठेवण्याचा इशारा; विविध शेतकरी संघटना आक्रमक
- ऊस दराबाबत तोडगा निघत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नाही : तुपकर
- सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे रक्त सांडून आंदोलन
 - पंढरपुरात बाजीराव विहीर येथे स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रस्ता रोको
- मंगळवेढ्यात सात शेतकरी संघटनांचे एकत्र येत आंदोलन
- दक्षिण सोलापूर तालुक्यात भंडारकवठे येथे आंदोलन
- बीबीदारफळ जनहित शेतकरी संघटनेचे उपोषण
- बार्शी तालुक्यातील उपळाई येथे इंद्रेश्वर कारखान्यावर जनहितचे धरणे
- पंढरपुरात सहकार शिरोमणी साखर कारखान्याची बस फोडली

Web Title: Solidarity problem in Solapur district, farmers' agitation aggressive: factories firm, administration hattal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.