सोलापूर जिल्हा परिषदेचे १८ गुरुजी बडतर्फ, सीईओंची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:30 PM2018-04-26T15:30:53+5:302018-04-26T15:30:53+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांची कारवाई, शिक्षक वर्गात खळबळ

Solapur Zilla Parishad's 18 Guruji Badshar, CEO's Action | सोलापूर जिल्हा परिषदेचे १८ गुरुजी बडतर्फ, सीईओंची कारवाई

सोलापूर जिल्हा परिषदेचे १८ गुरुजी बडतर्फ, सीईओंची कारवाई

Next
ठळक मुद्देशिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे न भरुन येणारे नुकसान होत होतेबडतर्फ झालेल्या शिक्षकांमध्ये मंगळवेढा १, सांगोला १, दक्षिण सोलापूर १, माळशिरस ४, बार्शी १, करमाळा २, माढा २, अक्कलकोट ३, मोहोळ १, पंढरपूर २ अशाप्रकारे प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांचा समावेश

सोलापूर: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक वारंवार गैरहजर असल्याने आणि त्यांना संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज १८ गुरुजींना (बुधवारी) बडतर्फीची कारवाई उगारत त्यांना घरचा रस्ता दाखवला. या प्रकाराने शिक्षक वर्गामध्ये  खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमांद्वारे एकीकडे शिक्षण विभागासह शाळांमधील शिक्षक परिश्रम घेत असताना काही मूठभर शिक्षक मंडळी मात्र या उद्देशाला गालबोट लागेल असे कृत्य करताना दिसत होते. यासंबंधी दीर्घकाळ शाळांमध्ये अनुपस्थित राहणाºया शिक्षकांना शिक्षण विभागाकडून वारंवार हजर राहण्याची संधीही देण्यात आली.

याउपरही त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झालेला नाही. शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे न भरुन येणारे नुकसान होत होते. यासंबंधी पालकांमधूनही तक्रारी कानावर येत होत्या. या प्रकाराची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी गांभीर्याने दखल घेत आज (बुधवारी) महाराष्टÑ जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील ४ (७) नुसार जिल्हा परिषदेच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली.

बडतर्फ झालेल्या शिक्षकांमध्ये मंगळवेढा १, सांगोला १, दक्षिण सोलापूर १, माळशिरस ४, बार्शी १, करमाळा २, माढा २, अक्कलकोट ३, मोहोळ १, पंढरपूर २ अशाप्रकारे प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे. बडतर्फीची कारवाई झालेले काही शिक्षक पाच-पाच वर्षांपासून शाळेकडे फिरकलेलेच नाहीत. त्याखालोखाल कुणी चार, तीन वर्षे गायब असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. याबद्दल जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अहवाल  मागवून त्यांच्यावर आज कारवाई केली. 

बडतर्फ झालेले हेच ते गुरुजी

  • - बडतर्फीची कारवाई झालेल्या शिक्षकांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी प्राथमिक शाळेवरील जालिंदर शंकर भोसले यांचा समावेश आहे. ते १६ जानेवारी २०१५ पासून गैरहजर आहेत, त्यांच्या चार वेतनवाढीही बंद केलेल्या आहेत. 
  • - सांगोल्याच्या कारंडेवाडी शाळेवरील ध. शि. मिसाळ २५ एप्रिल २०१५ पासून गैरहजर राहिल्याने त्यांच्या ४ वेतनवाढीही कायमस्वरुपी बंद केलेल्या आहेत. 
  • - दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड शाळेतील म. श्री. कोळी २१ नोव्हेंबर २०११ पासून अनुपस्थित  आहेत. 
  • - माळशिरस  तालुक्यातील गारवाड शाळेचे राजू रुपसिंग पवार, मिरे शाळेचे बा. म. साबळे , मानेवस्ती शाळेचे प्र. अ. साबळे , मा. म. राऊत (चौघेही २०१६ पासून गैरहजर)
  • - बार्शीच्या नारी प्राथ. शाळेचे शा. ना. बगाडे (२०१४ पासून गैरहजर), 

च्करमाळा, कुंभारगाव शाळेचे व. लो. भोसले (२०१६ पासून गैरहजर), 

  • - माढा तालुक्यातील भुर्इंजे शाळेचे आ. म. शिंगे (२०१६ पासून गैरसजर), टाकळी टें. चे म. म. निंबाळकर (२०१२ पासून गैरहजर), 
  • - अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव शाळेचे प्र. ना. पवार (२०१७ पासून अनुपस्थित), सिन्नूरचे रे. वि. सुतार (२०१६ पासून अनुपस्थित), मैंदर्गीचे नि. सू. कोळी (२०१६ पासून अनुपस्थित)
  • - करमाळा- पोमलवाडी शाळेचे श्री. अ. निंबाळकर (२०१६ पासून गैरहजर), कुंभारगाव शाळेचे व. लो. भोसले (२०१६ पासून अनुपस्थित)
  • - मोहोळ- अरबळी शाळेच्या मनीषा अ. चौधरी (२०१५ पासून गैरहजर)
  • - पंढरपूर- खेडभाळवणीचे बा. शं. धांडोरे (२०१७ पासून), मो.वस्ती गार्डीचे संपत भरत आसबे (२०१५ पासून आजअखेर) या शिक्षकांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी तडजोड नाही : भारुड

  • - शैक्षणिक दर्जा सुधारावा, जिल्हा परिषदेची मुले विद्याविभूषित व्हावीत यासाठी शासन सर्वतोपरी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. काही शिक्षक मंडळी मात्र दीर्घकाळ गैरहजर राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय? संबंधित शिक्षकांना संधी देऊनही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

गैरहजेरी खपवून घेणार नाही

  • - यापुढे सातत्याने गैरहजर राहणाºया शिक्षकांचे वर्तन खपवून घेतले जाणार  नाही. असे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास प्रशासन मागेपुढे पाहणार नाही, असे संकेतही सीईओ भारुड यांनी दिले. 

त्या प्रामाणिक शिक्षकांचे काय ?

  • - इमानेइतबारे अध्ययनाचे धडे गिरवणारे शिक्षक एकीकडे गुणवत्ता वाढीसाठी अटोकाट प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच जि.प. च्या शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्या प्रामाणिक शिक्षकांचे काय?  त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना रुजली जाऊ नये या भावनेतून उशिरा का होईना केलेल्या कारवाईचे शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांसह गुरुजींमधून स्वागत होत आहे.

Web Title: Solapur Zilla Parishad's 18 Guruji Badshar, CEO's Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.