यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे 

By Appasaheb.patil | Published: April 16, 2019 04:24 PM2019-04-16T16:24:55+5:302019-04-16T16:27:23+5:30

सोलापूरमधील मतदारांनी आतापर्यंत भरघोस सहकार्य केले आहे. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊच असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला. 

solapur sushilkumar shinde election | यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे 

यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे 

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुक प्रचाराच्या सांगता करताना आयोजित पत्रकार परिषदेत शिंदेंनी दिले स्पष्टीकरण- भाजपकडे विकासाचा अजेंडा नाही, मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : यापुढे आपण कोणतीच निवडणूक लढविणार नाही. ना आमदारकीची ना खासदारकीची अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

मंगळवारी सोलापूर शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी आ़ प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर यु़ एऩ बेरिया आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदाच्या निवडणुकीत लोकांचं प्रेम मिळत आहे. सोलापूरमधील मतदारांनी आतापर्यंत भरघोस सहकार्य केले आहे. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊच असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला. याचवेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली़ भाजपकडे विकासाचा अजेंडाच नाही़ रोज नवेनवे काही तरी घेऊन मतदारासमोर जाणारे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत आहेत असेही शिंदे म्हणाले.

Web Title: solapur sushilkumar shinde election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.