सोलापूर स्मार्ट सिटीकडे आहेत ३२३ कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:27 AM2018-08-07T11:27:08+5:302018-08-07T11:28:33+5:30

१६ प्रकल्प सुरू: कंपनीला १ कोटी ६३ लाख निव्वळ नफा

Solapur Smart City has deposits of 323 crores | सोलापूर स्मार्ट सिटीकडे आहेत ३२३ कोटींच्या ठेवी

सोलापूर स्मार्ट सिटीकडे आहेत ३२३ कोटींच्या ठेवी

googlenewsNext
ठळक मुद्दे निधीच्या बाबतीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी श्रीमंतकंपनीच्या विविध बँकांत ३२३ कोटींच्या अल्प मुदतीच्या ठेवीकंपनीला यावर्षी निव्वळ १ कोटी ६३ लाखांचा नफा

राजकुमार सारोळे
सोलापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्यामुळे गेल्या दोन वर्षात विकास कामाला एक रुपया निधी न मिळाल्याची नगरसेवकाची ओरड असली तरी निधीच्या बाबतीत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी श्रीमंत आहे. कंपनीच्या विविध बँकांत ३२३ कोटींच्या अल्प मुदतीच्या ठेवी असून, यातून कंपनीला यावर्षी निव्वळ १ कोटी ६३ लाखांचा नफा झाला आहे. 

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची १0 आॅगस्ट रोजी तेरावी बैठक होत आहे. या बैठकीला दुसºयांदा चेअरमन असीम गुप्ता हजर राहणार आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाच्या नावाने सध्या नागरिकांची ओरड असली तरी प्रगतिपथावर असलेल्या १६ प्रकल्पांची स्थिती अत्यंत चांगली आहे. स्मार्ट सिटीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेला निधी व महापालिकेचा हिस्सा असे ३२३ कोटी कंपनीकडे जमा आहेत. 

कंपनीने या रकमा विविध बँकांत अल्प मुदतीच्या ठेवीमध्ये गुंतविल्या आहेत. त्यामुळे या ठेवीवर कंपनीला चांगल्याप्रकारे व्याज मिळत आहे. या ठेवीतून कंपनीला आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ९८ हजार इतके व्याज मिळाले आहे. यात बचत खात्याचे व्याज २ लाख ३३ हजार ४0२ रुपये इतके जमा आहेत. विविध प्रकल्पाच्या टेंडर फीपोटी ५ लाख १0 हजार, माहिती अधिकारात दिलेल्या माहितीतून १ लाख ७७४ रुपये जमा झाले आहेत. अशा प्रकारे कंपनीचा यातून कंपनीचा निव्वळ नफा १ कोटी ६३ लाख ६0 हजार ६६८ रुपये इतका झाला आहे. 

अशा आहेत बँकांत ठेवी
- कॅनरा बँक: २९ कोटी ९७ लाख, आयडीबीआय: ९८.२४ लाख, विजया बँक: ९८.४८ लाख, युको: ५५.१६ लाख, आंध्रा बँक: ४.८३ लाख, बँक आॅफ इंडिया: २.४८ लाख. केंद्र शासनाकडून आलेला निधी: १९४ कोटी, राज्य शासनाकडून आलेला निधी: ९८ कोटी, महापालिकेचा हिस्सा: २0 कोटी असे ३१२ कोटी रुपये निधी ३१ जुलै अखेर उपलब्ध आहे. प्रकल्पावर पुढीलप्रमाणे खर्च झाला आहे. ओपन जिम: २ लाख ७४ हजार, किआॅस्क: ७ लाख ९२ हजार, ई टॉयलेट: १८ लाख ६१ हजार, स्मार्ट रोड: ३ कोटी ११ लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी वाहने (घंटागाडी): २ कोटी ७५ लाख, इंदिरा गांधी पार्क स्टेडियम: २ लाख ५0 हजार, खिंडरोड अल्टरनेट: ४७ लाख १ हजार, एलईडी लाईट प्रोजेक्ट: ३ हजार ६00 रु. असे ६ कोटी ८0 लाख खर्च झाले आहेत. 

आणखी २0 ठिकाणी टॉयलेट
- शहरात १0 ठिकाणी ई टॉयलेट बसविण्यात आले. हे टॉयलेट व्यवस्थित कार्यान्वित झाल्याने शहरात आता आणखी २0 ठिकाणी ई टॉयलेट बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये शुभराय आर्ट गॅलरी, रेल्वे स्टेशन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सातरस्ता बसथांबा, गर्ल्स होस्टेल, सिरॉक हॉटेलजवळ, रंगभवन, जिल्हा परिषद, पासपोर्ट आॅफिसजवळ, कोंतम चौक, टिळक चौक, गणपती घाट, सावरकर मैदान, भागवत टॉकीजसमोर, डफरीन चौक.

जलवाहिनीसाठी २00 कोटी
- एनटीपीसीने सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी २५0 कोटी राखीव ठेवले आहेत. यात स्मार्ट सिटी योजनेतील २00 कोटी जमा करून साडेचारशे कोटीत समांतर जलवाहिनी योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उजनी ते सोलापूर अशी ११0 दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यासाठी ४३९ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

ही योजना राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना आता स्मार्ट सिटी योजनेतून साकारण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत शहराचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी ३७0 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ९६ कोटी स्मार्ट सिटीच्या एबीडी एरियातील (जुने गावठाण) पाणी पुरवठा सुधारण्यासाठी खर्च करावयाचे आहेत. उर्वरित २७३ कोटींतून या योजनेसाठी निधी देण्याचा प्रस्ताव आहे. 

Web Title: Solapur Smart City has deposits of 323 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.