सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; इंद्रभवन अन् महापौर बंगलाही निघणार उजळून; कुरेशी, शिंदे, वडतिलेही करणार चौकांमध्ये रोषणाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:33 PM2018-12-25T12:33:55+5:302018-12-25T12:38:25+5:30

सोलापूर : नंदीध्वज मार्ग लख-लख दिव्यांनी उजळून निघावा... २५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना ...

Solapur Siddheshwar Yatra; Indraprastha and mayor Bangla also emigrate; Qureshi, Shinde, Vadilayo performances in the chowk! | सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; इंद्रभवन अन् महापौर बंगलाही निघणार उजळून; कुरेशी, शिंदे, वडतिलेही करणार चौकांमध्ये रोषणाई !

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; इंद्रभवन अन् महापौर बंगलाही निघणार उजळून; कुरेशी, शिंदे, वडतिलेही करणार चौकांमध्ये रोषणाई !

Next
ठळक मुद्देवीरशैव व्हीजनच्या व्हॉटस्अप ग्रुपवर आणि फेसबूक पेजवरही जनजागृती सुरु२५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना मिळणार वीरशैव व्हीजनच्या जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ श्री सिद्धरामेश्वर चरणी पत्रके ठेऊन करण्यात आला

सोलापूर : नंदीध्वज मार्ग लख-लख दिव्यांनी उजळून निघावा... २५-३० वर्षांपूर्वी यात्रेत दिसणाºया प्रकाशमय रस्त्यांचे स्मरण अन् उजाळा यंदा शहरवासीयांना मिळणार आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिलेल्या शब्दानुसार इंद्रभवन, महापौर बंगलाही उजळून निघणार आहे. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राजू कुरेशी, संजय कुरेशी, बांबू व्यापारी मनोज वडतिले हेही आपल्या भागात विद्युत रोषणाई करण्याचा विडा उचलला.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याबाबत वीरशैव व्हिजनने हाती घेतलेल्या जनजागृती मोहिमेचा सोमवारी सकाळी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचकमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, बसवराज अष्टगी, शिवानंद पाटील, बाळासाहेब मुस्तारे, प्रभुराज मैंदर्गी, श्रीशैल सास्तूर, बिपीन धुम्मा, प्रा. रेवणसिद्ध प्याटी, विवेक थळंगे, राजशेखर आमणगी, राजशेखर चडचणकर, गंगाधर गवसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे यांनी मोहिमेची माहिती दिली. नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे यांनी मोहिमेचे कौतुक करीत पंचकमिटीही मागे राहणार नसल्याची ग्वाही देत यात्रा प्रकाशमय करण्याची ग्वाही दिली. यावेळी सोमेश्वर याबाजी, सिद्राम बिराजदार, विजय बिराजदार, संजय साखरे, राजेश नीला, संगमेश कंटी, दीपक बडदाळ, श्रीमंत मेरु, मेघराज स्वामी, सचिन विभूते, विकास दसाडे, पौर्णिमा पाटील, वर्षा काशेट्टी, राजश्री गोटे, पल्लवी हुमनाबादकर आदी उपस्थित होते. 

आहे. 

कस्तुरबा मंडई परिसरात लायटिंग- नागणसुरे
- कस्तुरबा मंडई ते जैन गुरुकुलपर्यंत लायटिंग करणार असल्याचे सांगताना आरपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जयराज नागणसुरे यांनी कस्तुरबा मंडई, बाळीवेस, चाटी गल्लीतील व्यापाºयांना आपल्या दुकानांवर लाईटच्या माळा सोडण्याबाबत आवाहन करणार आहे. वीरशैव व्हीजनचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. 

समतेची, राष्ट्रीय एकात्मतेची ही यात्रा असते. सर्व धर्माचे, जातीचे लोक यात्रेत सहभागी होतात. मी दत्त चौक ते सोन्या मारुती मंदिरापर्यंत लायटिंग करणार आहे. मी करतोय, तुम्हीही करा.
- राजू कुरेशी
अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक

विजापूर वेस भागातून मानाचे सातही नंदीध्वज पुढे मार्गस्थ होतात. विजापूर वेस चौकात मोठे फोकस लावणार असून, या भागातील अधिकाधिक व्यापाºयांना वीरशैव व्हिजनच्या मोहिमेत सहभागी करून घेणार आहे.
- मनोज वडतिले
बांबू व्यापारी

वीरशैव व्हिजनचा उपक्रम खूपच आवडला. मी माझ्या घरावर, दुकानांवर लाईटच्या माळा सोडणार आहे. यामुळे मला व्हिजनच्या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. इतरांनीही सहभागी झाल्यास यात्रा प्रकाशमय होईल. अन्य सेवाभावी संस्थाही पुढे आल्या पाहिजेत. 
- संजय शिंदे
सामाजिक कार्यकर्ते.

‘लोकमत’चे कौतुक
- वीरशैव व्हीजनच्या जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ श्री सिद्धरामेश्वर चरणी पत्रके ठेऊन करण्यात आला. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे नीलकंठप्पा कोनापुरे, बाळासाहेब भोगडे यांनी ‘लोकमत’मध्ये येत असलेल्या ‘नंदीध्वज मार्गावर झळाळी’ या वृत्ताचे कौतुक केले. 

Web Title: Solapur Siddheshwar Yatra; Indraprastha and mayor Bangla also emigrate; Qureshi, Shinde, Vadilayo performances in the chowk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.