टेंभुर्णीत मटका अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलीसाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:39 AM2018-04-15T11:39:50+5:302018-04-15T11:39:50+5:30

ग्रामीण पोलिसांची कामगिरी, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Solapur rural policing raids at Temburniat Matta base | टेंभुर्णीत मटका अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलीसाचा छापा

टेंभुर्णीत मटका अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलीसाचा छापा

Next
ठळक मुद्देमटका बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांना १ लाख ४८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल व ९ आरोपी मिळून आले. 

टेंभुर्णी : पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या विशेष टीमने टेंभुर्णी शिवारातील शेतात चालणाºया मटका बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेत बुकीचालकांवर गुन्हा दाखल केला असून, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचे पथक टेंभुर्णीतील बेंबळे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना टेंभुर्णी-बेंबळे रोडवर चालणाºया मटका बुकीविषयी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने बागवाले वस्तीजवळ हरीश सुतार यांच्या शेतात चालणाºया कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना १ लाख ४८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल व ९ आरोपी मिळून आले. 

 ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीममधील पोसई गणेश निंबाळकर, पोहेकॉ. मनोहर माने, पोकॉ.श्रीकांत बुरजे, पोकॉ.अक्षय दळवी, पोकॉ.गणेश शिंदे, पोकॉ. सोमनाथ बोराटे, पोना. विष्णू बडे, पोना. श्रीकांत जवळगे या पोलीस कर्मचाºयांनी पार पाडली. या घटनेचा टेंभुर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत .कारवाईची मोहीम अशीच हाती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशी आहेत आरोपींची नावे़.....
- धाडीत सतीश पोपट ओहोळ (वय २७), अंकुश महादेव ननवरे (वय ३३), अशोक सुखदेव जाधव (वय ५०), राजू पांडुरंग धतिंगे (वय ३९), रमेश लक्ष्मण लाडोळे (वय ४७), बापू आण्णा माने (वय २६), नितीन उर्फ पप्पू खंडू माने (वय २८, सर्वजण रा.टेंभुर्णी, ता.माढा) तसेच सूरज महादेव पवार(वय २४, रा.पंढरपूर),अनिल सुरेश पवार (वय २४, रा.पणदरे, ता.बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच मटका बुकी चालवत असल्याने नामदेव धोत्रे टेंभुर्णी, रामा कदम (रा.अनगर, ता.मोहोळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Solapur rural policing raids at Temburniat Matta base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.