On the Solapur-Pune highway, there was an accident in ST, accident of 25 passengers, saving traffic police! | सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ एसटीचा अपघात, २५ प्रवासी जखमी, वाहतुक पोलीसाला वाचविताना झाला अपघात !
सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ एसटीचा अपघात, २५ प्रवासी जखमी, वाहतुक पोलीसाला वाचविताना झाला अपघात !

ठळक मुद्देया अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मोडनिंब, टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेल्या एसटीचा मोडनिंबजवळील वरवडे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ या अपघातात एसटीमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़  हा अपघात बुधवार १४ फेबु्रवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे़

उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेली एसटी बस (एमएच १४ बीटी ३९०२) ही बस सोलापूर बसस्थानकातून सकाळी ९ च्या सुमारास ठाणेकडे रवाना झाली़ या एसटी बसमध्ये सोलापूरसह उमरग्यातील प्रवासी प्रवास करीत होते़ वरवडे टोलनाक्याजवळ वाहनांची तपासणी करणाºया वाहतुक पोलीसाला वाचविण्याच्या नादात एसटीने समोरील एसटीला धडक दिली़ या धडकेत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य २५ जण जखमी झाले आहेत़ या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मोडनिंब, टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ 


Web Title: On the Solapur-Pune highway, there was an accident in ST, accident of 25 passengers, saving traffic police!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.