Solapur politics Harshhalla .. Guardian Minister felicitates; Congress escapes. Campaign opened against riot! | solapur politics; मास्तर हरखले.. पालकमंत्र्यांचा सत्कार करुन सरकले; कॉँग्रेस सटकली.. मारहाणविरोधात मोहीम उघडली !
solapur politics; मास्तर हरखले.. पालकमंत्र्यांचा सत्कार करुन सरकले; कॉँग्रेस सटकली.. मारहाणविरोधात मोहीम उघडली !

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्यानंतर गुरुवारी दोन टोकाच्या दोन घटनामोदी दौºयात रस्त्यावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मारहाण विरोधात कॉँग्रेसने जोरदार मोहीम

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्यानंतर गुरुवारी दोन टोकाच्या दोन घटना घडल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार आडम मास्तर यांनी भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा चक्क सत्कार केला. तसेच मोदी दौºयात रस्त्यावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मारहाण विरोधात कॉँग्रेसने जोरदार मोहीम उघडली आहे.

रे नगर फेडरेशनच्या वतीने उभारण्यात येणाºया घरकूल योजनेला सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे प्रवर्तक व माजी आमदार आडम मास्तर यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा गुरुवारी सन्मान केला आहे. 

रे नगर फेडरेशनतर्फे उभारण्यात येणाºया घरकुलाचा शुभारंभ बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना मोदी यांनी घरकुलाची चावी प्रदान करण्याच्या कार्यक्रमास येण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांनी सहकार्य केल्याने आडम यांनी देशमुख यांची निवासस्थानी भेट घेतली व रे नगरचे बोधचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

त्याचबरोबर प्रशासनानेही चांगले सहकार्य केल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी फेडरेशनच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख, मुरलीधर सुंचू, अमोल मेहता, किशोर मेहता, बाबुराव कोकणे, मल्लिकार्जुन बेलियार, दाऊद शेख, मोहन कोक्कुल उपस्थित होते. 

पोलीस मारहाणीबाबत दिशा ठरविण्यासाठी आज बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयावेळी निदर्शने करणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाºयांची शुक्रवारी बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश वाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मोदी सरकारने पोलिसांना हाताशी धरून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक व विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना निदर्शने, आंदोलने करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळाकडे जात असताना सुरक्षारक्षेच्या बॅरिकेडच्या बाहेर थांबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले.

सभास्थळापासून दूर ठिकाणी काळे फुगे सोडून आपला निषेध व्यक्त केला. असे असताना लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. अशा प्रकारे मुस्कटदाबी करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. या हुकूमशाही प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आम्ही पुढील धोरण ठरविणार आहोत, असे वाले यांनी सांगितले.

मारहाणीबाबत प्रतिक्रिया देताना तिरुपती परकीपंडला म्हणाले की, मोदी यांनी साडेचार वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी ८ जानेवारी रोजी पोलिसांना परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. आंदोलनकर्त्यांना अमानुष मारहाण केली. अंबादास करगुळे व सुभाष वाघमारे यांनी पोलिसांनी केलेल्या अत्याचाराबाबत निषेध व्यक्त केला. 


Web Title: Solapur politics Harshhalla .. Guardian Minister felicitates; Congress escapes. Campaign opened against riot!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.