सोलापूर महापालिकेत भाजपला झटका; परिवहन समिती शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:34 PM2018-03-17T12:34:28+5:302018-03-17T12:34:28+5:30

एमआयएम व काँग्रेसच्या मदतीने तुकाराम मस्के झाले परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड

Solapur Municipal Corporation shocks BJP; Transport Committee Shivsena | सोलापूर महापालिकेत भाजपला झटका; परिवहन समिती शिवसेनेकडे

सोलापूर महापालिकेत भाजपला झटका; परिवहन समिती शिवसेनेकडे

Next
ठळक मुद्देपरिवहनची जागा खेचल्याने भाजपच्या नेत्यांना विरोधकांची ताकद कळालीपरिवहनच्या कर्मचाºयांना ९ महिन्यांपासून पगार नाहीदोनच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने हात उंचावून १२ सदस्यांतून मतदान घेण्यात आले

सोलापूर : सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता असताना आणि परिवहन समितीमध्ये बहुमत असताना  काँग्रेस आणि एमआयएमच्या मदतीने  परिवहन समिती  भाजपाकडून हिसकावून घेत शिवसेनेने भाजपाला आज मोठा दणका दिला. दोन्ही उमेदवारांना समानसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे शिवसेनेचे उमेदवार तुकाराम मस्के यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले शुक्रवारी दुपारी केली. 

मनपा परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभागृहात पार पडली. परिवहन समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे गणेश जाधव, शिवसेनेतेर्फे तुकाराम मस्के आणि एमआयएमतर्फे साकीर सगरी या तिघांनी उमेदवारी अर्ज भरला होता. छाननीनंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी माघार घेण्यासाठी वेळ दिल्यावर एमआयएमचे सगरी यांनी अर्ज काढून घेतला.

त्यानंतर दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने हात उंचावून १२ सदस्यांतून मतदान घेण्यात आले. यात दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे ६-६ मते मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी चिठ्ठीद्वारे निवड करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या करून बॉक्समध्ये टाकण्यात आल्या. नगर अभियंता कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी गजेंद्र गुटाळ यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शिवसेनेचे तुकाराम मस्के यांचे नाव निघाले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी परिवहन समितीच्या सभापतीपदी मस्के यांची निवड झाल्याचे घोषित केले.

मस्के यांची सभापतीपदी निवड झाल्यावर सेना, काँग्रेस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विरोधी पक्षनेते महेश कोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार दिलीप माने, एमआयएमचे गटनेते तौफिक शेख, चेतन नरोटे यांच्या सहकार्यामुळे सभापती झाल्याची प्रतिक्रिया मस्के यांनी व्यक्त केली.

परिवहनच्या कर्मचाºयांना ९ महिन्यांपासून पगार नाही. सगळीकडे सत्ता असताना परिवहनला न्याय देता न आल्याची खंत भाजपच्या मावळत्या सभापतींनी व्यक्त केली आहे. साडेतीन लाखांसाठी २७ बस बसून आहेत. भाजपमधील गटबाजीमुळे पदाधिकाºयांनी या प्रश्नाकडे पाहिले नाही. राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे आहेत. परिवहनला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शिवसेना स्टाईलने काम करेन, असा विश्वास नूतन सभापती मस्के यांनी व्यक्त केला. 

विकासासाठी सेनेबरोबर: सगरी
एमआयएमचे गटनेते तौफिक शेख यांनी परिवहनमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली होती. बैठकीला जाईपर्यंत त्यांनी एमआयएमचे सदस्य सगरी यांना असा कानमंत्र दिला होता. पण प्रत्यक्ष मतदानावेळी सगरी यांनी शिवसेनेचे उमेदवार मस्के यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे भाजप व सेनेच्या दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. एमआयएमचे सदस्य सगरी तटस्थ राहिले असते तर भाजपचे उमेदवार जाधव विजयी झाले असते. पण त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसला. केवळ विकास डोळ्यांसमोर ठेवून सेनेसोबत जाण्याचा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे सगरी यांनी सांगितले. 

ही तर सुरुवात : कोठे
- विषय समितीत आमच्या एकीचा भाजपला धक्का बसला. स्थायीमध्येही आमची एकजूट दिसली. आता परिवहनची जागा खेचल्याने भाजपच्या नेत्यांना विरोधकांची ताकद कळाली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिली. ही तर सुरुवात आहे. आता पुढील निवडणुका पाहा केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता असतानाही भाजपच्या नेत्यांना परिवहनला दिशा देता आली नाही. चेतन नरोटे यांनीही महाआघाडीच्या एकजुटीचा हा भाजपला धक्का असल्याचे सांगितले. 

Web Title: Solapur Municipal Corporation shocks BJP; Transport Committee Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.