सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांना रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न, श्रीशैल गायकवाडसह २० जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 12:23pm

घंटागाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाºया वाहन-चालक, बिगारी सेवकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत येऊन मनपा आयुक्तांच्या निजी कक्षाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आणि स्वत: व आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीशैल चंद्राम गायकवाड (वय ४८) सह जवळपास ३० जणांविरोधात सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ३ : घंटागाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाºया वाहन-चालक, बिगारी सेवकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत येऊन मनपा आयुक्तांच्या निजी कक्षाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आणि स्वत: व आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीशैल चंद्राम गायकवाड (वय ४८) सह जवळपास ३० जणांविरोधात सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़  मंगळवारी, २ जानेवारी रोजी सकाळी १० ते १०़५० च्या सुमारास हा प्रकार महापालिका आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयासमोर घडला़ अपर आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त त्रिंबक पाटील हे मनपा आयुक्तांसमवेत बोलत होते़ घंटागाड्यांवरील कंत्राटी कामगारांचा प्रश्न घेऊन श्रीशैल गायकवाड याने कार्यकर्त्यांना घेऊन आला़ हातामध्ये रॉकेलची कॅन, बाटली, लाठीकाठी घेऊन कार्यकर्त्यांसमवेत आला़ बाहेर जोरजोरात घोषणाबाजी करत आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला़ यावेळी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर थांबलेले कर्मचारी त्रिंबक ताटे, अमित काळे, पोलीस कर्मचारी हरिकृष्ण चोरमले, हवालदार महेश शेजेराव, पोलीस नाईक  प्रशांत गाडे यांनी त्याला आत घुसण्यास विरोध केला़ बाटलीतील रॉकेल स्वत:च्या आणि इतरांवर ओतून आत शिरला़ तसेच मनपा आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केला़  यावेळी सदर बझारचे पोलीस धाऊन येत त्याच्याजवळील रॉकेल कॅन आणि काडेपेटी काढून घेतली़ अधिक तपास फौजदार पाटील करीत आहेत़  ------------------------- पोलिसांमुळेच वाचलो - घंटागाडी कर्मचाºयांची समजूत काढूनसुद्धा आडमुठी भूमिका घेत त्यांनी कामबंद आंदोलन केले. सोमवारी सफाई अधीक्षकास दमबाजी केली. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्त मागविला होता. कचरा संकलनासाठी वाहने मार्गस्थ करून मी कार्यालयात येऊन बसलो. अशातच काही कर्मचारी संतप्त होऊन माझ्या कार्यालयाच्या दिशेने येत आहेत, अशी खबर पोलिसांना लागली. साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी तातडीने माझ्या कार्यालयाचा ताबा घेतला व आतून तिन्ही दारे बंद केली. बाहेर काय घडले हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.  --------------------- पर्यायी व्यवस्था सुरू... - या प्रकारानंतर आयुक्त डॉ. ढाकणे हे गंभीर झाले आहेत. घंटागाडी कर्मचाºयांना सहानुभूती दाखवून वेतन वाढवून दिले तरी अशा पद्धतीने गुंडगिरी करून प्रशासन व नागरिकांना वेठीस धरले. विनाकारण दहशत निर्माण केली. त्यामुळे प्रशासनाने आता इतर कर्मचाºयांच्या मदतीने कचरा उचलण्याची तयारी केली आहे. यापुढे महापालिकेत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. शहर स्वच्छतेसाठी प्रशासन तयार असून, गरज पडली तरी लोकसहभाग घेऊ, अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केली आहे. 

संबंधित

सोलापूर जिल्हा न्यायालयातील फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण वाढले, माहिती अधिकारात सत्यता उघड
 ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !
सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव
सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त देशमुख वाड्यात योगदंडाची पूजा, यात्रेतील धार्मिक विधींची सांगता, कप्पडकळी विधीसाठी भाविकांची गर्दी
युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण !

सोलापूर कडून आणखी

 ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !
सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव
सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त देशमुख वाड्यात योगदंडाची पूजा, यात्रेतील धार्मिक विधींची सांगता, कप्पडकळी विधीसाठी भाविकांची गर्दी
युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण !
राज ठाकरे यांना साहित्यातलं फारसे काही कळत नाही, मात्र ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत, ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची टिका

आणखी वाचा