Solapur Market; १९३८ सालच्या दुर्मिळ कारला आली ११ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:09 PM2019-03-14T13:09:06+5:302019-03-14T13:10:45+5:30

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : हो, सोलापूर बदलतंय अन् सोलापूरकरही... हौसेला मोल नसतं ते अगदी खरंच आहे. इंग्लंडमधील आॅस्टिन कंपनीची ...

Solapur Market; The rare car of 1938 saw the demand of 11 lakh | Solapur Market; १९३८ सालच्या दुर्मिळ कारला आली ११ लाखांची मागणी

Solapur Market; १९३८ सालच्या दुर्मिळ कारला आली ११ लाखांची मागणी

Next
ठळक मुद्देसध्या अस्तर मारण्याचे काम पूर्ण झाले असून, काम पूर्ण झाल्यावर लाल रंगाची ही दुर्मिळ कार सोलापूरकरांच्या दर्शनास येणार सोलापुरात परदेशी बनावटीचे कार रिपेअर करणारे प्रशिक्षिक मेकॅनिकही आहेत

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : हो, सोलापूर बदलतंय अन् सोलापूरकरही... हौसेला मोल नसतं ते अगदी खरंच आहे. इंग्लंडमधील आॅस्टिन कंपनीची जी कार १९३८ मध्ये केवळ १२ हजार रुपयांना मिळायची, ती जुनी कार एक हौशी सोलापूरकर बंगळुरूमधून मिळवली अन् लागणारे स्पेअर पार्ट इंग्लंडहून मागवून ती तयार करवून घेत आहे. केवळ स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी हीच कार ११ लाख आणि त्याहूनही अधिक रक्कम देण्यासाठी सोलापुरातील हौशी मंडळी पुढे सरसावली आहेत. जिथे ही कार बनवली जात आहे, त्या वर्कशॉपमध्ये दुसरी एक अ‍ॅम्बॅसिडर आकाराची इंग्लंडमेड मॉरिस मायनर कंपनीची नजरेत भरणारी अन् त्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह न आवरणारी हिरव्या रंगाची कारही सध्या चालू स्थितीत आहे. 

कष्टकºयांचं सोलापूर म्हणजे गिरणगाव समजलं जायचं. इथे काहीच नाही, असा कधी काळी सूरही ऐकावयास मिळत होता. आता सोलापूरची जेणेकरून सोलापूरकरांची मानसिकता बदलत चालली आहे. बदलत्या सोलापुरात सोलापूरकरही बदलत चालले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत चाललेल्या कामांमुळे सोलापूरचा लूक बदलताना दिसतोय. हा बदल सोलापूरकरांना जाणवत नसला तरी कामानिमित्त सोलापुरात आलेल्या पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथील मंडळींना नक्कीच जाणवत आहे. काही मंडळींनी इथल्या नातेवाईकांसमोर, मित्रांसमोर बोलूनही दाखवले. बदलत्या या सोलापुरात हौशी मंडळींचीही कमतरता नाही. अशाच एका हौशी व्यापाºयाने इंग्लंडमधून जुनी कार मागवली. कारला लागणारे स्पेअर पार्टही त्यांनी आणले. 

आॅटोमोबाईलमध्ये डिप्लोमा केलेले इलियास मुमताजअहमद शेख यांचा जुन्या कार विक्रीचा व्यवसाय आहे. कारमधील खडान्खडा माहिती असताना त्याचा उपयोग त्यांनी आपल्या जुन्या कार विक्रीच्या व्यवसायाला करून घेत आहे. एकदा ते आपले सहकारी शब्बीर सय्यद यांना घेऊन इंदौर येथे गेले. तेथे एका ठिकाणी त्यांना इंग्लंडमधील येथील आॅस्टिन कंपनीची जुनी कार पाहावयास मिळाली. १९३८ सालातील ही कार कोण घेईल का? मात्र हौसेला मोल नसते, त्यानुसार त्यांनी ती गाडी विकत घेतली अन् ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून त्यांनी ती आपल्या शोरूमवजा वर्कशॉपमध्ये आणली. आज प्रशिक्षित मेकॅनिककडून ती कार पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम या वर्कशॉपमध्ये सुरू आहे. 

सध्या अस्तर मारण्याचे काम पूर्ण झाले असून, काम पूर्ण झाल्यावर लाल रंगाची ही दुर्मिळ कार सोलापूरकरांच्या दर्शनास येणार आहे. 

हॉर्नही जुन्या काळातील पितळीचाच!
- आजकाल दुचाकी अथवा चारचाकी वाहनांना असलेले हॉर्न आधुनिक पद्धतीचे आहेत. मात्र या आॅस्टिन कंपनीच्या गाडीचा हॉर्न मात्र ब्रिटिशकालीन पितळीचाच आहे. तोंडाने जरी फुंकर मारली तर १० फुटांपर्यंत त्याचा आवाज जातो, असे नामवंत कार मेकॅनिक शब्बीर सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कारची चारही चाके टू-व्हीलरसारखी !
- सध्या भारतात रस्त्यावर धावणाºया कारच्या चाकांपेक्षा या आॅस्टिन कारची चाके मात्र टू-व्हीलरप्रमाणे पाहावयास मिळतात. टू-व्हीलर चाकांमुळे कारची गती अधिक असते अन् पेट्रोलचीही चांगलीच बचत होते. चौघे आरामात बसतील, अशी आतील आसनव्यवस्था असून, सनरूफचा (छताचा काही भाग उघडा) प्रकारही या कारमध्ये पाहावयास मिळतो.

चार प्रशिक्षित मेकॅनिक लागले कामाला !
- सोलापुरात परदेशी बनावटीच्या कार दुरुस्ती करणारे मेकॅनिक सोलापुरात आहेत. शब्बीर सय्यद, रेहान इनामदार, सर्फराज काझी आणि बाबुराव सोनवणे हे चार प्रशिक्षित मेकॅनिक १९३८ मधील आॅस्टिन-७ ही कार बनवत आहेत. किरकोळ स्पेअरपार्टसाठी त्यांना हैदराबाद, कोलकत्ता आणि वेळप्रसंगी इंग्लंडमध्ये जावे लागत आहे. पुढील वर्षी दिल्लीत ब्रिटिशकालिन कारचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनात ही कार नंबर वनचा किताब पटकावेल, अशी अपेक्षा चौघांनी व्यक्त केली. 

सोलापुरात काही नाही, हे विचारा. परदेशी बनावटीचे कार रिपेअर करणारे प्रशिक्षिक मेकॅनिकही आहेत. आस्टिन-७ ही कार जेव्हा रस्त्यावर धावेल, तेव्हा ती कार सोलापूरकरांच्या पसंतीस उतरेल. काही जण बंगल्यात, हॉटेलसमोर शो-पीस म्हणून ही कार रहावी, असा विचारही करीत आहेत. जेव्हा दिल्लीतील कार प्रदर्शनात ही कार नंबर वन येईल, तेव्हा बदलत्या सोलापूरच्या प्रचितीचा दाखला मिळाल्याशिवाय राहणार नाही. 
-इलियास शेख, 
जुने कार विक्रेते.

Web Title: Solapur Market; The rare car of 1938 saw the demand of 11 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.