सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 09:52 AM2017-12-01T09:52:01+5:302017-12-01T09:52:24+5:30

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे.

Solapur Lokmat Silvermahotsav Year 2017: Honor to Star 25 in Solapur District | सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान

सोलापूर लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष २०१७ : सोलापूर जिल्ह्यातील ‘स्टार २५’ चा आज होणार सन्मान

Next
ठळक मुद्देमहासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या स्टार्सचा सत्कार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘जनरेशन नेक्स्ट : स्टार २५’ ही पुरवणी प्रकाशित केली आहे. आपल्या कर्तृत्वाने उद्योग, व्यवसाय, सामाजिक, राजकारण आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाºया पंचवीस स्टार्सचा शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे. शिवछत्रपती रंगभवन येथे सकाळी दहा वाजता हा सोहळा आयोजित केला असून, महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या स्टार्सचा सत्कार होईल. माजी मंत्री आमदार दिलीप सोपल समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Solapur Lokmat Silvermahotsav Year 2017: Honor to Star 25 in Solapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.