बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:19 PM2018-02-10T15:19:11+5:302018-02-10T15:20:43+5:30

बार्शी तालुक्यातील इर्ले व यावली येथे ग्रामीण पोलीसांच्या विशेष टिमने अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर छापा मारला़ यात ६७ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपींना ताब्यात घेतले़

Solapur grameen policemen raid on illegal sand rush in Yavali, Barshi taluka, and 8 accused in the possession of Rs 67 lakh, 15 accused in Vairag police station | बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बार्शी तालुक्यातील इर्लेसह यावली येथील अवैध वाळू उपशावर सोलापूर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६७ लाख रूपयांच्या मुद्देमालासह  ८ आरोपींना घेतले ताब्यात, १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल२ जे.सी.बी, ६ ट्रँक्टर, ९ ट्रॅली व वाहनातील १० ब्रास वाळू असा एकूण सुमारे ६७ लाख ९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : बार्शी तालुक्यातील इर्ले व यावली येथे ग्रामीण पोलीसांच्या विशेष टिमने अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर छापा मारला़ यात ६७ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपींना ताब्यात घेतले़ याप्रकरणी १५ जणांविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस़ विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे इर्ले येथील भोगावती नदीच्या पाञातून अभिजीत शिंदे व बाळासाहेब शिंदे (दोघे रा इर्ले ता बार्शी) हे व यावली येथील भोगावती नदीच्या पाञातून जीवन लवटे व पंडित पाटील हे आपल्या साथीदारासह चोरून वाळू उपसा करीत आहेत अशी बातमी मिळाली होती़ त्यानुसार पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टिमने सदर उपसा व वाहतूक होणा-या ठिकाणी छापा टाकून २ जे.सी.बी, ६ ट्रँक्टर, ९ ट्रॅली व वाहनातील १० ब्रास वाळू असा एकूण सुमारे ६७ लाख ९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी बाळासाहेब भागवत शिंदे, कुंडलिक बलटू मेरड, अभिजीत भारत शिंदे, महेश महादेव घायतिडक, धनाजी ञिंबक पाखरे, अकुंश राजेंद्र शिंदे सर्व रा इर्ले ता बार्शी, पंडित भारत पाटील, गणेश रामहरी उकरंडे दोघे रा यावली ता बार्शी यांना ताब्यात घेवून फरार आरोपी भारत भागवत शिंदे, अजीत भारत शिंदे, सतिश भागवत शिंदे, कृष्णा कदम, संदीप विठ्ठल गायकवाड सर्व रा इर्ले, जीवन संभाजी लवटे, संदेश पोपट पाटील दोघे रा यावली ता बार्शी हे असल्याने सर्व आरोपी विरूद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक एस़ विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पो.नि किरण अवचर, सपोनि संदीप धांडे, पोहेकॉ मनोहर माने, अंकुश मोरे, बिरप्पा बन्ने, पो.ना अमृत खेडकर, पो.कॉ गणेश शिंदे, अनुप दळवी, पांडूरंग केंद्रे, अभिजीत ठाणेकर, अक्षय दळवी, सागर ढोरे पाटील, अमोल जाधव, सचिन कांबळे, विलास पारधी, विष्णू बडे, बालाजी नागरगोजे व आर.सी.पी प्लाटून नं ५ यांच्या टिमने काम केले आहे़

Web Title: Solapur grameen policemen raid on illegal sand rush in Yavali, Barshi taluka, and 8 accused in the possession of Rs 67 lakh, 15 accused in Vairag police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.