आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : राज्यात सहा ठिकाणी शासकीय अंभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस होता. मात्र रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सदस्य प्रणिती शिंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार एकाच परिसरात तंत्रनिकेतन व अंभियांत्रिकी महाविद्यालय देता येत नाही. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ही विद्यार्थ्यांची गरज आहे. खासगी महाविद्यालयातील शुल्क विद्यार्थ्यांना परवडत नाही म्हणून राज्यात सहा ठिकाणी तंत्रनिकेतन ऐवजी अंभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेता या दोन ठिकाणची तंत्रनिकेतन बंद होणार नाही. या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील देशमुख, गणपत देशमुख, भारत भालके, राहुल कुल, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.