सोलापूर - चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.

सोलापूर - तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथे ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच अंत झाल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. संगमेश् मडीवालअप्पा माळगे (वय 21 रा. घोगडे वस्ती सोलापूर) दीपक जयंत गुमडेल (वय 21रा. मंगळवार पेठे, सोलापूर ), अक्षय विजय आसबे ( वय 22 रा. शेळवे ता. पंढरपूर) अशी मयत तिघांची नावे आहेत.

मयत तिघे सोलापूर जवळील नागेश अर्किड महाविद्यालयात शिक्षण घेत होते. रात्री अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयातील स्टडी रूम ला गेले होते. पहाटे चहा पिण्यासाठी रोड ला आले असता तिघांना अनोळखी ट्रक ने जोराची धडक दिली. त्यात तिघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर शासकिय रूग्णालयात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भेट दिली.