सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार निवडून येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:38 PM2018-04-05T14:38:26+5:302018-04-05T14:38:26+5:30

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा विश्वास, महामेळाव्याची जय्यत तयारी

In Solapur district, two BJP MPs and six MLAs will be elected | सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार निवडून येतील

सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार निवडून येतील

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनेक नावे चर्चेतबाजार समितीमधील अनेक कायदे शेतकºयांच्या हितासाठीजिल्ह्यातील भाजपा प्रासंगिक करारात अडकला

राकेश कदम 

सोलापूर : आगामी निवडणुकीत जिल्ह्यातून भाजपाचे दोन खासदार आणि सहा आमदार निवडून येतील, अशी व्यूहरचना करीत आहोत. भाजपा ही चालू गाडी आहे. मित्रपक्ष बनलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी लवकरात लवकर या गाडीत यावे. जे येतील त्यांचे सीट पक्के आहे; अन्यथा पर्यायी माणसेही तयार आहेत, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी व्यक्त केला. 

मुंबईच्या बीकेसी मैदानावर ६ एप्रिल रोजी भाजपाचा राज्यस्तरीय महामेळावा होतोय. जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला जाणार आहेत. त्याच्या जिल्हास्तरीय तयारीत गुंतलेल्या शहाजी पवार यांनी बुधवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला. भाजपा हा केडर बेस पक्ष असल्याचे सांगून पवार म्हणाले, २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात आम्ही जिल्ह्यात ह्यचलो बुथ की ओरह्ण हे अभियान राबविले. शासनाच्या योजना घराघरांत पोहोचविण्याबरोबर बुथ स्तरावरील यंत्रणा मजबूत केली जात आहे. 

जिल्ह्यातील २९०० बुथपैकी २६०० बुथवर पोहोचलो आहोत. अनगर, मोहिते-पाटलांच्या भागात माणसं मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र लोकांत मिसळून आम्ही यंत्रणा उभी करतोय. या भेटीत लोक चांगल्या गोष्टी सांगतात, तशा उणिवाही सांगतात. या उणिवा अनेक वर्षांपासून आहेत. त्याला भाजपा जबाबदार नाही. पण त्या  प्रदेश पातळीवर पोहोचविल्या जात आहेत. 

शहर मध्यसह सहा मतदारसंघांवर लक्ष
- जिल्ह्यातील भाजपा प्रासंगिक करारात अडकला आहे. या मुद्यावर पवार म्हणाले, १९८० साली भाजपाचे दोनच खासदार होते. लोकांच्या विचारात बदल झाला. आमचे मित्रपक्ष बनलेली जिल्ह्यातील नेतेमंडळी भाजपामध्ये येणार होती, ती का आली नाहीत, हे मला सांगणे अवघड आहे. खरं तर या मंडळींनी लवकरात लवकर भाजपामध्ये यावे. ते येतील की नाही हे सुध्दा निवडणुकीपूर्वी तीन-चार महिने आधीच कळेल. परंतु, प्रदेश पातळीवरुन एकाच मतदारसंघात तीन पर्याय निश्चित करण्यात आले आहेत. शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ आणि इतर तीन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.

पालकमंत्री का बोलले माहीत नाही
- बाजार समितीमधील अनेक कायदे शेतकºयांच्या हितासाठी नसून व्यापाºयांच्या हिताचे आहेत. ते बदलावेत यासाठी मी सुभाष बापूंकडे आग्रह करतोय. शेतकºयांच्या हितासाठी आम्ही बाजार समितीची निवडणूक लढविणार आहोत. शासनाने सामाईक खात्यावर एकाच शेतकºयाला मतदानाचा अधिकार दिला होता. यामुळे ४५ हजार शेतकरी वंचित राहणार होते. परंतु, मी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्याच शासनविरोधात उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. माझ्या पुढाकारामुळे सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. पालकमंत्री स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे बोलले, ते का बोलले मला माहीत नाही. परंतु, आम्ही सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खासदार शरद बनसोडे यांचा सल्ला घेऊनच निवडणूक लढविणार आहोत. वेळ आली तर बाजार समितीबाबत खूप बोलणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेला पक्ष देईल त्या उमेदवारासोबत आम्ही
- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनेक नावे चर्चेत आहेत. अमर साबळे यांचे नाव आम्ही वर्तमानपत्रातूनही वाचले आहे. इतर लोकही संपर्कात आहेत. विद्यमान खासदारही काम करीत आहेत. परंतु, पक्षाकडून जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचे काम आम्ही करु, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: In Solapur district, two BJP MPs and six MLAs will be elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.