सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढला, ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:01 AM2017-11-25T11:01:11+5:302017-11-25T11:03:18+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता वेग वाढला असून, शुक्रवारी रात्री एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.

In Solapur district, the process of debt waiver increased, 31 thousand farmers contributed Rs 170 crore | सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढला, ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये जमा

सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रक्रियेचा वेग वाढला, ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये जमा

Next
ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रियेतील मोठ्या चुकांमुळे शेतकºयांच्या याद्या अंतिम करणे कठीण सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणारछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमाजिल्हा बँकेचे ३१ हजार ५८ शेतकरी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता वेग वाढला असून, शुक्रवारी रात्री एकट्या सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकरी खातेदारांचे १७० कोटी रुपये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले आहे.
दिवाळी अगोदर शेतकºयांना कर्जमाफी करणार असे शासनाने सांगितले परंतु आॅनलाईन प्रक्रियेतील मोठ्या चुकांमुळे शेतकºयांच्या याद्या अंतिम करणे कठीण झाले होते. शेतकºयांनी भरलेल्या कर्जमाफीच्या फॉर्मवरील रक्कम व शासनाकडून माफीची आलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत येत असल्याने कर्जमाफीची प्रक्रियाच थांबली आहे. आता शासनस्तरावर काही सुधारणा केल्याने आता कर्जमाफीसाठी शेतकºयांच्या याद्या व रक्कमही येण्यास सुरुवात झाली आहे.
---------------------
जिल्हा बँकेचे ३१ हजार ५८ शेतकरी
- राज्यस्तरावर दोन व जिल्हास्तरावरील २६ अशा २८ शेतकºयांचे दिवाळी अगोदर कर्ज माफ झाले. 
- त्यानंतर ३० शेतकºयांची यादी आली होती त्यापैकी २६ शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले व चार शेतकºयांची नावे दुरुस्तीसाठी पाठवली.
- शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी व अन्य अधिकाºयांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सोलापूर जिल्हा बँकेच्या ३१ हजार शेतकºयांचे १७० कोटी रुपये रात्रीच जमा होतील असे सांगितले. 
- आतापर्यंत जिल्हा बँकेच्या ३१ हजार ५८ शेतकºयांची कर्जमाफी झाली.
च्राष्ट्रीयीकृत बँकांना पैसे व शेतकºयांची नावे आली असली तर त्याची आकडेवारी समजली नाही. 
----------------------
नमुनादाखल यादीत १८२ दुरुस्त्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकेला बुधवारी रात्री एक हजार  शेतकºयांची यादी नमुनादाखल तपासणीसाठी शासनाने पाठवली होती. यापैकी ८१८ शेतकºयांचे फॉर्मप्रमाणे पैसे आल्याचे तपासणीत आढळले. दोन व तीन वेळा ५४ शेतकरी व चुकीच्या रकमा १२८ अशा १८२ शेतकºयांच्या चुका असल्याचे जिल्हा बँकेच्या तपासणीत दिसून आले.

Web Title: In Solapur district, the process of debt waiver increased, 31 thousand farmers contributed Rs 170 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.