सोलापूर जिल्ह्यात पाणलोटच्या कामास कृषी खात्याचा निरुत्साह, दोन वर्षात दोन कोटी खर्च तर साडेचार कोटी शिल्लक: खर्च होत नसल्याने दुसरीकडे वर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:18 PM2018-01-20T12:18:59+5:302018-01-20T12:19:53+5:30

पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी कृषी खात्याचा निरुत्साह असून उत्तर तालुक्यातील सात गावांसाठीची तब्बल चार कोटी ५१ लाख ३ हजार रुपये शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून निधीची मागणी करण्याची सूचना आल्यानंतर उत्तरच्या कार्यालयाकडून सतत नकारघंटा असल्याने चार कोट रुपये इतर तालुक्याला दिले असल्याचे सांगण्यात आले. 

In the Solapur district, the Department of Agriculture's dullness in the work of waterlogging, two crores of expenditure in two years and four and a half billion: | सोलापूर जिल्ह्यात पाणलोटच्या कामास कृषी खात्याचा निरुत्साह, दोन वर्षात दोन कोटी खर्च तर साडेचार कोटी शिल्लक: खर्च होत नसल्याने दुसरीकडे वर्ग 

सोलापूर जिल्ह्यात पाणलोटच्या कामास कृषी खात्याचा निरुत्साह, दोन वर्षात दोन कोटी खर्च तर साडेचार कोटी शिल्लक: खर्च होत नसल्याने दुसरीकडे वर्ग 

Next
ठळक मुद्देपावसाचा थेंब न् थेंब पडलेल्या जागेवरच जमिनीत जिरला पाहिजे, ही शासनाची संकल्पना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कामासाठी पैसे मागणी करण्याबाबत विचारणा केल्यानंतर उत्तर तालुका कृषी कार्यालयाकडून नकारघंटाउत्तरचा चार कोटींचा निधी अक्कलकोटला वर्ग करण्यात आला. 


अरुण बारसकर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी कृषी खात्याचा निरुत्साह असून उत्तर तालुक्यातील सात गावांसाठीची तब्बल चार कोटी ५१ लाख ३ हजार रुपये शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून निधीची मागणी करण्याची सूचना आल्यानंतर उत्तरच्या कार्यालयाकडून सतत नकारघंटा असल्याने चार कोट रुपये इतर तालुक्याला दिले असल्याचे सांगण्यात आले. 
शासनाच्या चांगल्या व शेतकरी उपयोगी कार्यक्रमाला कशी आडकाठी आणावी, याचे उत्तम उदाहरण उत्तर तालुका कृषी कार्यालयाच्या कारभाराकडे पाहिल्यानंतर दिसून येते. पावसाचा थेंब न् थेंब पडलेल्या जागेवरच जमिनीत जिरला पाहिजे, ही शासनाची संकल्पना आहे. यातूनच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून पाणलोट विकासासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, बीबीदारफळ, नान्नज, रानमसले, गावडीदारफळ , पडसाळी व वांगी या गावांची निवड पाणलोटसाठी झाली आहे. या गावांसाठी कोणती कामे कोणत्या वर्षी करावयाची, याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. गावाच्या भौगोलिक क्षेत्रानुसार निधीही मंजूर केला आहे. मात्र त्याप्रमाणे कामे करण्यास कृषी खात्याची यंत्रणा तयार नाही. त्यामुळे कंपार्ट बंडिंग, सिमेंट नाला बंडिंग, चर खोदाई आदीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी चार कोटी ५१ लाख ३ हजार रुपये शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून कामासाठी पैसे मागणी करण्याबाबत विचारणा केल्यानंतर उत्तर तालुका कृषी कार्यालयाकडून नकारघंटा येते. त्यामुळे उत्तरचा चार कोटींचा निधी अक्कलकोटला वर्ग करण्यात आला. 
----------------------------
रानमसलेचा सर्वाधिक पैसा शिल्लक 
- अकोलेकाटीचे ३४ लाख ९२३ रुपये, बीबीदारफळचे एक कोटी १६ लाख ३१ हजार ५४५ रुपये, नान्नजचे एक कोटी ११ लाख ५३ हजार ११५ रुपये, रानमसल्याचे एक कोटी १६ लाख ५६ हजार ६८७ रुपये, गावडीदारफळचे ३० लाख ६५ हजार १८६ रुपये, पडसाळीचे ३१ लाख १६ हजार १५२ रुपये, वांगीचे ९ लाख ८६ हजार ६७९ रुपये असे चार कोटी ५१ लाख रुपये शिल्लक आहेत. 
 अवघा दोन कोटी खर्च
- पाणलोटसाठी निवडलेल्या गावासाठी प्रति हेक्टरी १२ हजार रुपये केंद्रशासन देते. यापैकी प्रति हेक्टरी ६ हजार ७२० रुपये पाणलोटच्या कामासाठी तर अन्य उपक्रमासाठी उर्वरित रक्कम खर्च करावयाची आहे. त्याप्रमाणे अकोलेकाटीसाठी ५६ लाख ३९ हजार, बीबीदारफळसाठी एक कोटी ८० लाख ७७ हजार, नान्नजसाठी एक कोटी २६ लाख २० हजार, रानमसलेसाठी एक कोटी ४६ लाख ३५ हजार, गावडीदारफळसाठी ७१ लाख २७ हजार, पडसाळीसाठी ५१ लाख एक हजार व वांगीसाठी १९ लाख ६३ हजार असे ६ कोटी ५१ लाख ६२ हजार रुपये मंजूर असून पैकी दोन वर्षात दोन कोटी ५९ हजार रुपयेच खर्च झाले आहेत. 
----------------
उत्तर तालुक्यात कामे झाली नाहीत; मात्र अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निधी खर्च झाला नाही तर शेतकºयांचे नुकसान होणार आहे. जबाबदारी निश्चित करुन कारवाई करु.
 - बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: In the Solapur district, the Department of Agriculture's dullness in the work of waterlogging, two crores of expenditure in two years and four and a half billion:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.